ECI on Hitendra Thakur Party Symbol Whistle : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे निवडणूक चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिल्या आहेत. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी सह इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच अपक्षांना शिटी या चिन्हाचा वापर करता येणार नसल्यामुळे निवडणुकीसाठी इतर चिन्हाचा आधार घ्यावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना ३० जानेवारी २०२४ रोजी पत्र पाठवून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी शिटी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी या आशयाच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत जनता दल (युनायटेड) या पक्षाने उमेदवारी दाखल न केल्याने या चिन्हाचा वापर बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा जागेसाठी केला होता.

Sumit Wankhede in Arvi Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
अखेर शर्यतीत सुमित वानखेडे यांची बाजी, विद्यमान आमदार काय करणार ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Asaram Borade, Partur assembly Constituency,
परतूरमध्ये काँग्रेसला धक्का; मतदार संघ शिवसेनेकडे
three major parties in maha vikas aghadi to leave 18 seats for six small parties
१८ जागांमध्ये छोट्या पक्षांत रस्सीखेच; आघाडीने दिलेली लेखी हमी उघड करण्याचा इशारा
paithan vidhan sabha
परंडा व पैठण मतदारसंघांत ठाकरे गटात पेच
pratibha dhanorkar
लोकसभेत भाजपचा प्रचार करणाऱ्या जोरगेवारांसाठी मते कशी मागायची ? चंद्रपूर राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेसचा विरोध
Dispute continues in Mahavikas Aghadi in Vani Assembly Constituency
वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा कायम; उमेदवार जाहीर करून भाजपची प्रचारात आघाडी
Shivsena in Palghar Constituency Assembly Election 2024
Palghar Vidhan Sabha Constituency : पालघर विधानसभा मतदारसंघात श्रीनिवास वनगांचा ‘नाराजीनामा’ आणि मग पक्षासाठी काम करण्याचा निर्धार

हे ही वाचा… शिंदेंचा पाईक मिलिंद नार्वेकरांच्या भेटीला

भारत निवडणूक आयोगाने २३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये शिटी या चिन्हाचा समावेश मुक्त चिन्हांच्या यादीमध्ये केल्याने निवडणूक चिन्हे (राखीव व वाटप) कायदा १९६८ मधील तरतुदीच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी या चिन्हाची मागणी केली होती. या अनुषंगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे ३१ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.

या पत्रात राजकीय पक्षांसाठी राखीव चिन्हांचा समावेश मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट करता येऊ नये असे यासंदर्भातील कायद्यात स्पष्ट तरतूद असताना शिटी या चिन्हा चा मुक्त चिन्ह यादीत समाविष्ट करण्यात आल्याकडे राज्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे लक्ष वेधण्यात आले. तसेच २६ मार्च २०१४ रोजी भारत निवडणूक आयोगाने काढलेल्या एका अन्य अधिसूचनेत अरुणाचल प्रदेश, बिहार व मणिपूर या तीन राज्यात जनता दल (युनायटेड) हा नोंदणीकृत राज्य पक्ष असल्याने या पक्षाचे “बाण” हे चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर शिटी हे चिन्ह राज्यातील नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांना देण्यासंदर्भात मार्गदर्शन ही विनंती करण्यात आली होती.

हे ही वाचा… ठाणे-कल्याणच्या वेशीवर आगरी अस्मिता प्रभावी

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने काल सायंकाळी तातडीने उत्तर देतना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिटी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हे चिन्ह इतर राजकीय पक्ष अथवा अपक्षांना देण्यात येऊ नये असे देखील सुचित केल्याने वसई, नालासोपारा व बोईसर येथे आमदार असणाऱ्या बहुजन विकास आघाडीला नवीन चिन्हाचा शोध घेणे आवश्यक ठरणार आहे.