नागपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात बौद्ध आणि मुस्लीम मतांच्या विभाजनातूनच भाजपला दोनदा यश मिळवता आले. १९९५ ला भाजपचे भोला बढेल आणि २०१४ ला डॉ. मिलिंद माने येथून विजयी झाले. यावेळी उत्तर नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षात मुख्य लढत असली तरी बसप आणि वंचित, अपक्ष उमेदवार अतुल खोब्रागडे मैदानात आहेत. त्यामुळे दलित मतांचे विभाजन झाल्यास भाजप २०१४ प्रमाणे यंदाही काँग्रेसच्या विजयाची घोडदौड रोखणार का? असा प्रश्न पुढे येत आहे.

उत्तर नागपूर हा एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा गड होता. आंबेडकरी विचारधारेला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. मधल्या काळात रिपब्लिकन पक्षातील गटातटाच्या राजकारणामुळे काही बौद्ध मतदार हे बसपकडे वळले. परंतु, बसपलाही उत्तर नागपूर कधी सर करता आले नाही. भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० झाली असली तरी या काळात उत्तर नागपूरमध्ये त्यांनी उमेदवार दिला नाही. १९९० साली उत्तरमधून भाजपने पहिल्यांदा भोला बढेल यांच्या रूपाने निवडणूक लढवली. यावेळी बढेल यांची लढत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खोब्रागडे) उमेदवार उपेंद्र शेंडे यांच्याशी होती. शेंडे यांना ३३ हजार ६०३ मते मिळाली तर भोला बढेल २१३५८ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. पुढे १९९५ च्या निवडणुकीत भोला बढेल पुन्हा मैदान उतरले असून ६३ हजार ४८८ मते घेत ते विजयी झाले. बौद्ध मतदारबहुल उत्तर नागपुरातील भाजपचा हा पहिलाच विजय होता. मात्र, यावेळी रिपाइंचे (खोब्रागडे) उपेंद्र शेंडे यांनी ४४ हजार मते घेतली होती. बसपने १६ हजार तर स्वतंत्र उमेदवार शेख मुस्तफा शेख हुसेन यांनी ११ हजार मते घेतली होती. या मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा २०१४ मध्ये भाजपचे डॉ. मिलिंद माने उत्तरमधून विजयी झाले. यावेळी बसपचे किशोर गजभिये यांनी ५५ हजार मते घेतली तर काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत ५० हजार मतांनी तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे मतविभाजन झाल्यावरच भाजपचा विजय शक्य असल्याचे दिसून येते.

nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Devendra Fadnavis, Devendra Fadnavis visit to Nagpur,
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांचा पहिला नागपूर दौरा ठरला, स्वागताची जय्यत तयारी
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
attack on police Nagpur, Nagpur, police Panchnama Nagpur,
हे काय चाललेय नागपुरात? पंचनामा करायला गेलेल्या पोलिसावरच हल्ला….

हेही वाचा : Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासमोर येवला मतदारसंघ राखण्याचे आव्हान; शरद पवार भुजबळांच्या विरोधात आक्रमक का?

उत्तर नागपूरमधील जातीय समीकरण

उत्तर नागपूरमध्ये ४ लाख २५ हजार मतदार असून यात बौद्ध मतदारांची संख्या १ लाख ७० हजार इतकी आहे. याखालोखाल ८० हजार मुस्लीम मतदार आहेत. मध्य नागपूरप्रमाणे उत्तर नागपुरातही हलबांची १२ हजार मते आहेत. याशवािय पंजाबी आणि सिंधी समाजाची २५ हजारांच्या घरात मतदान आहे. आदिवासी समाजाचे ५ हजार मतदान आहे.

हेही वाचा : नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !

या उमेदवारांवर लक्ष

उत्तर नागपूर राखीव मतदारसंघातून यावेळी २६ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी बसपचे मनोज सांगोळे रिंगणात आहेत. सुरुवातीला बुद्धम राऊत यांना बसपने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, वेळेवर उमेदवार बदलण्यात आल्याने बसपच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसी नाराजी आहे. बसपचे सुरेश साखरे यांनी २०१९ मध्ये २३ हजार मते घेतली होती हे विशेष. यंदा वंचितकडून मुरलीधर मेश्राम मैदानात आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवार अतुल खोब्रागडे रिंगणात आहेत. या तिन्ही बौद्ध उमेदवारांच्या मताधिक्यावर उत्तर नागपूरची निवडणूक ठरणार हे विशेष.

Story img Loader