चंद्रपूर : राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे व शेतकरी संघटनेचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्यातील लढत रंगतदार होणार आहे. वयाची ७४ व ७३ वर्षे पूर्ण केलेल्या या दोन्ही उमेदवारांची प्रचारात चांगलीच दमछाक होत आहे. त्यांना भाजपातील दोन नाराज माजी आमदार मदत करतात, की पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कुणबीबहुल राजुरा मतदारसंघात राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिंपरी या चार तालुक्यांचा समावेश आहे. एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी धोटे, चटप आणि भाजपचे देवराव भोंगळे या तिघांमध्येच मुख्य लढत आहे. दिसायला तिरंगी लढत असली तरी प्रत्यक्षात धोटे व ॲड. चटप यांच्यातच तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहे. वयोमानामुळे दोन्ही माजी आमदारांना मतदारसंघातील चार तालुक्यांत तीन लाखांपेक्षा अधिक मतदारांपर्यंत पोहचताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, दोघेही मतदारांसमोर जाताना ही माझी शेवटची निवडणूक आहे, अशी साद घालत आहे.
राजुरा मतदारसंघात सिमेंट कारखाने, कोळसा खाणी व इतर उद्योगांत काम करणारा कामगार वर्ग मोठ्या संख्येत राहतो. उद्योगांतील कामगार मतदारांची प्रत्यक्ष भेट घ्यायची म्हटले तर सकाळी आठ वाजतापासून सायंकाळी आठवाजतापर्यंत पायाला भिंगरी लावून फिरावे लागते. त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत गावांत सभा, स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी लावून प्रचार करावा लागतो. अशा स्थितीतही हे दोन्ही वयोवृद्ध उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात.
हे ही वाचा… मलकापूरमध्ये छुपी बंडखोरी, मतविभाजन कळीचा मुद्दा
हे ही वाचा… आर्थिकदृष्ट्या मागास भंडारा जिल्ह्याचे आमदार कोट्यधीश…
उमेदवारी न मिळाल्याने ॲड. संजय धोटे आणि सुदर्शन निमकर हे भाजपचे दोन माजी आमदार नाराज आहेत. ते या दोन उमेदवारांपैकी कोणाला मदत करतात, की पक्षाचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या पाठिशी उभे राहतात, यावरच येथील निकाल अवलंबून असेल.