बुलढाणा : मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’यात्रेमुळे प्रकाशझोतात आलेल्या जळगाव जामोद मतदारसंघाच्या यंदाच्या लढतीत भाजप अर्थात आमदार संजय कुटे यांची घोडदौड थांबणार का, असा प्रश्न प्रचाराच्या मध्यावरच ऐरणीवर आला आहे.

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते, सलग चारदा आमदार राहिलेले संजय कुटे हे पाचव्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. एकसंघ भाजप, विकासकामे, व्यापक जनसंपर्क, विरोधी पक्षांसोबतही असलेले मधुर संबंध आणि महाविकास आघाडीतील बिघाडी ही मागील लढतीतील स्थिती यंदाही कायम आहे. मागील लढतीतील आघाडीच्या उमेदवार स्वाती वाकेकर (काँग्रेस) यंदाही मैदानात आहेत. विरोधी आघाडीतील सुंदोपसुंदी, गटबाजी, विस्कळीत प्रचार, यामुळे कुटे यांनी गेल्या लढतीत १ लाख मतांचा आकडा सहज ओलांडला होता. काँग्रेसच्या वाकेकर यांनी झुंज देत ६५ हजार मतांचा आकडा गाठला होता. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने २८ हजारांच्या आसपास मते घेत आघाडीची उरलीसुरली बिघाडी केली होती. जिल्हा भाजपचे संकटमोचक म्हणून परिचित असलेले कुटे यांच्यासाठी जळगाव जामोदमधील लढत यंदाही संकट नाहीच, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

Kishor Patkar latest marathi news
नवी मुंबई: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर, बंडाच्या हंगामात पक्ष जोडणीचे आव्हान
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Pune Cantonment Assembly Constituency challenging for BJP Prestige fight for Congress
‘पुणे कॅन्टोन्मेंट’ भाजपसाठी आव्हानात्मक; काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत
akola vidhan sabha
अकोल्यामध्ये लोकसभेतील मतांचे गणित विधानसभेत कायम राहणार?
Maharashtra Assembly Election 2024,
लातूरमध्ये काँग्रेसकडे वळलेल्या लिंगायत मतपेढीला भाजपची साद
Rishikesh Patel and Atmaram Patel focus on Amravati election
गुजरातच्‍या ‘पटेलां’चे अमरावतीच्‍या निवडणुकीवर लक्ष !
maharashtra vidhan sabha election 2024 pune assembly constituency bjp brahmin jodo
‘कसब्या’तील धड्यातून पुण्यात भाजपचे ‘ब्राह्मण जोडो’
maharashtra vidhan sabha election 2024, chandrapur district, congress, bjp
लोकसभेतील मताधिक्य कायम राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान, भाजपला चिंता

आणखी वाचा-लक्षवेधी लढत : झिरवळ सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात

काँग्रेसतर्फे लढण्यास यंदा २२ नेते इच्छुक होते. त्यांतून वाकेकर यांना पुन्हा संधी मिळाली. काँग्रेसमधील गटबाजी प्रचारातही कायम आहे. वंचितने मूळचे मतदारसंघातील परंतु अकोला येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ. प्रवीण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघात जवळपास चाळीस हजार मतदान असलेला पाटील समाज आणि आंबेडकरी समाजाची गठ्ठा मते गृहीत धरून त्यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक नेते प्रशांत डीक्कर यंदा जिद्दीने रिंगणात उतरले आहेत. त्यांना कुणबीसह अठरापगड समाजाचे समर्थन आहे.

प्रचारात रंगत

मतदारसंघाचे सलग तीनदा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते कृष्णराव इंगळे आणि त्यांच्या राजकीय वारसदार असलेल्या कन्या स्वाती वाकेकर यांनी यंदाच्या लढतीत व प्रचारात मागील वेळी झालेल्या चुका टाळल्या आहेत. त्यामुळे आघाडीच्या प्रचारात बऱ्यापैकी नियोजन आहे. माळी समाज, ५५ हजाराच्या आसपास असलेली मुस्लीम-दलित मते, काँग्रेसचे पारंपरिक मतदान, यावर त्यांची भिस्त आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक यांनी येथे सभा घेत गटबाजी उफाळणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या. येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि सहकारमधील मोठे नेते प्रसेनजीत पाटील नाराजी विसरून त्यांच्या प्रचारात उतरले आहेत.

आणखी वाचा- Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?

भाजपच्या प्रचारात इतरांच्या तुलनेत चांगले नियोजन आहे. कुणबी समाजाच नव्हे बारी समाजासारखे ओबीसी समूह कुटे यांची पारंपरिक ताकद राहिली आहे. गेल्या पाच वर्षांत कुटे यांनी मतदारसंघात सर्व समाजाची सभागृहे, अगदी ‘शादीखाने’ उभारून ‘सोशल इंजिनिअरिंग’चा केलेला प्रयोग त्यांच्यासाठी प्रचारातही उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी प्रसेनजीत पाटील मैदानात नसणे त्यांच्या पथ्यावर पडले आहे. शिंदे गट आणि अजितदादा गटाचीही त्यांना साथ आहे. त्यांच्या प्रचारासाठी कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. मात्र, प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासून असलेली आघाडी ते टिकवून आहेत.

वंचितचे डॉ. पाटील यांना निवडणुकीचा अनुभव नसून स्थायिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी प्रचार यंत्रणा राबविली आहे. स्वाभिमानीचे डीक्कर यांच्याकडे साधनसामग्रीची वानवा असली तरी शेतकरी आणि बारा बलुतेदार समर्थकांच्या मदतीने त्यांचा आक्रमक प्रचार सुरू आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी मतदारसंघात राबविलेले संपर्क अभियान त्यांना पूरक ठरत आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी शक्तिप्रदर्शन केलेच पण लोकवर्गणीतून अमानत रक्कम भरली. त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती आणि आमदार कुटे विरुद्ध घेतलेली रोखठोक भूमिका, अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतील गैरव्यवहार, पक्षपातीपणा यावरून त्यांनी प्रचारातही रान उठविले आहे. या लढतीतील ते ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतात, असा रागरंग आहे.

आणखी वाचा-Narendra Modi : धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’चा नारा का दिला? काय आहे कारण?

मतविभाजन निर्णायक

पश्चिम विदर्भातील किंबहुना जिल्ह्याच्या घाटाखालील कुणबी-मराठा वाद इथे आहेच. तो याच समाजापुरता मर्यादित नाही. यामुळेच जातीय समीकरणे निकालात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. मुख्य लढत युती विरुद्ध आघाडी असली तरी वंचित आणि स्वाभिमानीमुळे होणारे मतविभाजनदेखील निर्णायक घटक आहे. हे मतविभाजन कोणासाठी मारक आणि कोणासाठी तारक ठरते, यावर जय-पराजयाचे गणित अवलंबून असेल.