Congress in Kolhapur North Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अचानकपणे मागे घेतल्यावर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराज यांच्याकडे करड्या शब्दात विचारणा केली होती. यावरून आता शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यातील संबंध दुरावणार का अशी चर्चा होत आहे. काल दुपारी वाद झाडल्यानंतर हे दोघेही गारगोटी येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या काँग्रेस प्रवेश कार्यक्रमाला एकत्रित आले तेव्हा उभयतांच्या चेहऱ्यावर वादाचा लवलेशी दिसला नाही. त्यामुळे छत्रपती घराणे आणि पाटील घराणे या बावड्यातील दोन बड्या राजकीय घराण्यातील तणावपूर्ण संबंधावरून नवी राजकीय गणिते मांडली जात आहेत.

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल अखेरचा दिवस होता. तो सर्वात लक्षवेधी ठरला काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांच्या माघारी मुळे. लोकसभा निवडणुकीला काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली होती. त्यात त्यांना मोठे यश मिळाले. त्यानंतर काँग्रेसने आधीची राजेश लाटकर यांची उमेदवारी बदलून ती त्यांच्या स्नुषा मधुरिमाराजे छत्रपती यांना देण्याचा निर्णय घेतला. परंतु, मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले. लढाईच्या वेळी राजीनामा म्हणजे नेमेके काय असते हे कॉंग्रेस नेतृत्वाला यातून कळून चुकले.

Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP, Harshvardhan Patil, Indapur
हर्षवर्धन पाटील हे दलबदलू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांंची टीका
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Jijau organization, Mahayuti, Thane district,
ठाणे जिल्ह्यात जिजाऊ संघटनेची साथ महायुतीला ?
satara shivsena
महेश शिंदे, मकरंद पाटील यांना पुन्हा उमेदवारी, साथ दिलेल्या विद्यमान आमदारांवर विश्वास
Nationalist Ajit Pawar Group MLA Yashwant Mane
यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण? मोहोळमध्ये आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी
peace on border our priority pm modi tells xi jinping
सीमेवरील शांततेला प्राधान्य असावे’; जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
Eknath Shinde
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा पुन्हा गुवाहाटी दौरा! निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी

छत्रपती विरुद्ध सतेज ?

हा धक्का सहन करणे कॉंग्रेसला चांगलेच जड गेले. कॉंग्रसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा यावेळचा रुद्रावतार बरेच काही सांगून जाणारा होता. याच मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात सतेज पाटील हे शाहू महाराज यांच्याशी बोलताना चांगलेच भडकले होते. तुम्हाला निवडणूक लढवायचे नव्हती तर आधीच का सांगितले नाही. अचानक उमेदवारी मागे घेणे बरोबर नाही. मला आणि काँग्रेस पक्षाला कशासाठी तोंडघशी का पाडले आहे, अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला. छत्रपती घराण्याशी संबंधित उद्योगपती तेज घाटगे यांना उद्देशून हे अजिबात बरोबर केले नाही. ज्यांनी आग लावण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना लक्षात ठेवा, असा इशारा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडताना निवडणुक लढवायची धमक नव्हती तर उभे राहायचे नव्हते, अशा शब्दात आगपाखड केली.

हे ही वाचा… बालेकिल्ला राखण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान, अकोला पश्चिममध्ये हिंदू मतांच्या ध्रुवीकरणामुळे मोठी अडचण

शाहू महाराज सारख्या व्यक्तींना सतेज पाटील यांनी असे बोल लावल्याने त्यावरून उलट सुलट चर्चा होत आहे. शाहू महाराज, छत्रपती घराणे आणि सतेज पाटील यांच्यातील संबंध आता नेमके कसे राहणार याची चर्चा होत आहे. हा प्रकार छत्रपती घराणे खपवून घेणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कालच्या प्रकारानंतर रात्री भावूक झालेले सतेज पाटील आज सामान्य स्थितीत दिसून आले. त्यांनी कालच्या प्रकाराचा उल्लेख करीत छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. गादीचा सन्मान कायमच राखणार, असे नमूद करून कालच्या वादावर पडदा पडला असल्याचे सांगितले. पाठोपाठ दुपारी शाहू छत्रपती यांनी सतेज पाटील यांनी जाहीरपणे संतापजनक भावना व्यक्त केल्या. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला असला सांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असा निर्वाळा दिला आहे. यामुळे सतेज पाटील – छत्रपती घराणे यांच्यातील वादावर पडदा पडल्याचे दिसत आहे.