अलिबाग : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १५ जागांसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी शांततेत पार पडली. तिन्ही जिल्ह्यांत सुमारे ७० टक्के मतदान झाले. मतदानासाठी मुंबईतून हजारोंच्या संख्येने मतदार कोकणात दाखल झाल्याचे पहायला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात चिपळूण, दापोली, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी मतदारसंघांचा समावेश आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ६०.३५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दापोलीत सर्वाधिक ६५ टक्के तर रत्नागिरीत सर्वांत कमी ५९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना सोडल्या तर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवार रिंगणात होते. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ६३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. कुडाळ येथे सर्वाधिक ७० टक्के मतदान झाले. तर सावंतवाडीत ६२ तर कणकवलीत ६० टक्के मतदान झाले होते. रायगडमधून आदिती तटकरे, रत्नागिरीतून उदय सामंत, तर सिंधूदुर्गातून दीपक केसरकर या मंत्र्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट

हेही वाचा : मराठवाडा : आरक्षण, जरांगे आणि नातीगोती

रायगडमध्ये तीन ठिकाणी यंत्र बंद पडण्याच्या घटना

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सातही मतदारसंघात बुधवारी विधानसभेचे मतदान शांततेत पार पडले. मतदान प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी तांत्रिक अडथळ्यांच्या, तीन ठिकाणी यंत्र बंद पडण्याच्या घटना घडल्या. परंतु प्रशासनाच्या तत्परतेमुळे हे सर्व बिघाड दूर करून पुढे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील एकूण ७३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, सुमारे ७० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, महाड, उरण, श्रीवर्धन या सात विधानसभा मतदारसंघात गेले तीन आठवडे राजकीय प्रचार सभांचा धुराळा उडाला. जिल्ह्यात एकूण ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये पनवेल मतदार संघात १३, कर्जत ९, उरण १४, पेण ७, अलिबाग १४, श्रीवर्धन ११, महाड मध्ये ५ उमेदवारांचा समावेश होता. बुधवारी सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी मतदान अतिशय संथगतीने सुरू होते. ९ वाजेपर्यंत अवघे ७.५० टक्के इतकेच मतदान झाले. नंतर हळूहळू मतदानाचा वेग वाढत गेला.

हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्र: महायुतीची व्यूहरचना; ‘मविआ’चे व्यूहभेदन

लोकसभेत पाठ, विधानसभेत मेहनत

● मतदानासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. एसटी बस, रेल्वे आणि खासगी वाहनांनी हजारो मतदार कोकणात आल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सकाळच्या सत्रात मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात माणगाव, कोलाड, इंदापूर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

● लोकसभा निवडणुकीकडे मुंबईकर मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र विधानसभेसाठी मुंबईकर मतदार यावेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मेहनत घेतली. त्यांची येण्याजाण्याची व्यवस्था आणि भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.

Story img Loader