Malegaon Vidhan Sabha election 2024 : अन्य पाच विधानसभा मतदार संघांमध्ये आघाडी मिळूनही एकट्या मालेगाव मध्य मतदार संघात एक लाख ९४ हजार मतांनी मागे राहिल्याने धुळे लोकसभा मतदार संघात भाजपला पराभूत व्हावे लागले. मुस्लिमबहुल मालेगावातून मिळालेली एकगठ्ठा मते काँग्रेससाठी तारणहार बनली. विधानसभा निवडणुकीतही मालेगाव मध्य मतदार संघात महायुतीकडून विजयाची अजिबातच शक्यता दिसत नसल्याने कोणी उमेदवारीच दाखल न केल्याने निवडणुकीपूर्वीच त्यांनी मालेगावात हार मानल्याचे स्पष्ट होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मालेगाव मध्य मतदार संघात एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, काँग्रेसचे एजाज बेग, समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद आणि अपक्ष आसिफ शेख या चार प्रमुख उमेदवारांसह एकूण १६ जण सध्या रिंगणात आहेत. माघारीची मुदत संपल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांमध्ये एकेक जागा पदरात पाडून घेण्यासाठी अजूनही रस्सीखेच सुरु असताना मालेगाव मध्य मतदार संघाबाबत महायुतीत नेमकी उलट स्थिती बघावयास मिळाली. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांनी या जागेचा विचारच केला नाही. भाजप आणि शिवसेना यांनी ही जागा आनंदाने अजित पवार गटाला सोडली. परंतु, पवार यांची भूमिका जरी धर्मनिरपेक्ष असली तरी ते भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांना साथ देत असल्याने त्यांना उमेदवारच मिळाला नसल्याचे पदाधिकारी मान्य करतात. त्यामुळे महायुतीविना येथे निवडणूक होणार आहे.
सुमारे ९८ टक्के मुस्लिम मतदार असलेल्या मालेगाव मध्य मतदार संघात मागील विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी काँग्रेसच्या आसिफ शेख यांना पराभूत केले होते. पक्षीय राजकारणाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी शेख यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शेख यांनी शरद पवार गटाला साथ देणे पसंत केले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला जाईल, असे शेख यांनी पक्ष सोडताना गृहित धरले होते. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने महानगरप्रमुख एजाज बेग यांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने शेख यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. शेख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात. मध्यंतरी मालेगाव दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी शेख यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. पवार गटाने या जागेवर शेख यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीने जोरकस प्रयत्न केले होते. परंतु, पवार यांची भाजपबरोबर असलेली युती मुस्लिमबहुल मालेगावात अडचणीची असल्याने शेख यांनी पवार यांना नकार कळवून अपक्ष लढण्याचा निर्णय कायम ठेवल्याचे सांगितले जाते.
हे ही वाचा… Who is Anil Deshmukh : काटोलमध्ये सलीलविरुद्ध अर्ज दाखल करणारे ‘अनिल देशमुख’ कोण आहेत ?
मतदार संघाची पुनर्रचना होण्यापूर्वी मालेगाव मतदार संघात संगमेश्वर आणि कॅम्प या हिंदू बहुसंख्य भागाचाही समावेश होता. त्यावेळीही पराभव होणार माहीत असतानाही प्रत्येक निवडणुकीत भाजपतर्फे उमेदवार उभा केला जात असे. २००९ मध्ये कॅम्प आणि संगमेश्वर हा भाग मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात समावेश करण्यात आल्याने मालेगाव मध्य मतदार संघात हिंदू मतांची संख्या नगण्य झाली. २००९ च्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला ७९५ आणि २०१४ मध्ये शिवसेनेला १३७५ मते मिळाली होती. २०१९ मध्येही भाजपला केवळ १४५० मते मिळाली होती. त्यामुळे यावेळी महायुतीकडून कोणीही येथे उमेदवारीसाठी प्रयत्नच केले नाहीत.