Manoj Jarange Patil Withdrew from the Maharashtra Assembly Election 2024: मुस्लिम आणि दलित मतांची जुळवणी करुन देणाऱ्या व्यक्तींनी रात्री तीन वाजेपर्यंत त्यांच्या उमेदवारांची यादी दिली नसल्याचे फुटकळ कारण देत मराठा नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीमधून माघार घेत पुन्हा एकदा ‘ पाडापाडी’ चे प्रारुप कायम राहील, असे संकेत दिले आहेत. .. रविवारी रात्री परतूर, हदगाव, धाराशिव, भूम- परंडा, कळमनुरी, गंगाखेड, कन्नड, बीड, पाथरी. फुलंब्री या मतदारसंघात उमेदवार देऊ असे जाहीर करण्यात आल्यानंतर जरांगे यांचे निवडणूक प्रारुप शिवसेना ( उद्धव ठाकरे ) यांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. जाहीर केलेल्या मतदारसंघापैकी बहुतांश मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती. मात्र, सकाळी सर्व मतदारसंघातून माघार घेत असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले.

गोदाकाठच्या १२८ गावातून सुरू झालेल्या मराठा आंदोलनाची व्याप्ती निवडणुका लढविण्यापर्यंत असल्याचे चित्र जरांगे यांनी निर्माण केले होते. सरकारमधील मंत्री, उमेदवारी न मिळालेल्या मंडळींनी गेल्या आठवडाभर आतंरवली सराटीच्या चकरा मारल्या. याच काळात काही मुस्लिम, बौद्ध धर्मगुरू, आनंदराज आंबेडकर यांच्यासह काही दलित नेत्यांच्या भेटी घेऊन जरांगे यांनी ‘ मराठा- मुस्लिम – दलित’ ही मतपेढी बांधली जाऊ शकते का, याचा अंदाज घेतला. ही मतपेढी निवडणूक जिंकवू शकते, अशा मतदारांघाची नावेही काढण्यात आली. मात्र, उमेदवारी काेण या मुद्दयावर एकमत होऊ शकले नाही. परिणामी रात्रीतून निवडणूक लढवायची नाही निर्णय त्यांनी घेतला. आता पुन्हा एकदा लाेकसभेप्रमाणे ‘ पाडापाडी’ चे प्रारुप कायम राहील, असे संकेत त्यांनी सोमवारी सकाळच्या पत्रकार बैठकीत दिले.

Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
bjp mla Gopichand padalkar
Jat Vidhan Sabha Constituency: जतमध्ये स्थानिक विरुद्ध उपरा प्रचार भाजपसाठी तापदायक
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा…

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा – मुस्लिम- दलित ही मतपेढी ‘ महाविकास आघाडी’ च्या बाजूला सरकल्याने मराठवाड्यात ‘महायुती’ला केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकता आली. मराठवाड्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. आता पुन्हा लोकसभेतील ‘ ज्यांना पाडायचे त्यांना पाडा, ज्यांना जिंकून आणायचे त्यांना आणा’ अशी भूमिका जरांगे यांनी व्यक्त केली. निवडणुकीमध्ये केवळ एकाच जातीचे मते घेऊन निवडणून येता येत नाही, असेही ते वारंवार सांगत होते. त्यामुळे जरांगे यांचे पाडापाडीचे जुने पारुप पुन्हा रिंगणात असू शकेल, असा दावा केला जात आहे.

रविवारी जाहीर केलेल्या मतदारसंघामुळे महाविकास आघाडीच्या गटात अस्वस्थता होती. सोमवारी जरांगे यांच्या पत्रकार बैठकीनंतर ‘ महायुती’ च्या गटातील नेत्यांमध्ये चलबिचल असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Jat Vidhan Sabha Constituency: जतमध्ये स्थानिक विरुद्ध उपरा प्रचार भाजपसाठी तापदायक

संभ्रमित करणाऱ्या भूमिका

मुंबईत ‘ आझाद मैदाना’ वर आंदोलन करणार असे सांगूून ‘ अधिसूचना’ काढल्यानंतर वाशी येथून परतलेल्या जरांगे यांची भूमिका ‘ भाजप’ विरोधी होती. मात्र, महायुतीचे राज्याचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ते नव्हते. त्यांच्यावर त्यांनी कधीही टीका केली नाही. देवेंद्र फडणवीस मात्र हे नेहमीच त्यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी राहिले. एकनाथ शिंदे याच्या वतीने नेहमी चर्चेस येणारे उदय सामंत हे खरे तर कोकणातील नेते. पण जरांगे आणि सामंत यांच्यामध्ये सातत्याने चर्चा होते. कॉग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण वगळता अलिकडच्या काळात महाविका आघाडीतील कोणताही मोठा नेता जरांगे यांना भेटण्यासाठी गेला नाही. त्यामुळे शिंदे यांच्या उमदेवारांविषयी जरांगे सहानुभूती ठेवतील, अशी चर्चा होती. रविवारी रात्री तानाजी सावंत यांच्या भूम मतदारसंघात उमेदवारी देऊ नका, असे कार्यकर्ते सांगत असतानाही त्यांनी हा मतदार लढवू असे जाहीर केले होते. ‘ महायुती’ च्या बाजूने जरांगे यांचा कौल जाईल अशी चर्चा सुरू झाल्यानंतर सकाळी निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि पाडापाडीचे प्रारुप कायम राहील, असेही त्यांनी सांगितले. उमेदवार देऊ, उमेदवार पाडू, आज उमेदवार जाहीर करू, उद्या यादी देऊ, अर्ज काढून घ्या, अर्ज भरा अशा अनेक सूचना ऐन निवडणुकीमध्ये जरांगे देत होते. त्यामुळे त्यांचा ‘ आंदोलन संभ्रमित’ झाला होता. निवडणुकीतील प्रचाराचा कालावधी केवळ १४ दिवसाचा असताना या सूचनांमुळे नवाच गोंधळ उडाला असता. त्यामुळे जरांगे प्रभाव विधानसभा निवडणुकीमध्ये दिसणार नाही, असा दावा केला होता. आता नव्या भूमिकेमुळे ‘ पाडापाडी’ चे जुने प्रारुप पुन्हा अवरेल का, याच्या उत्सुकता सर्वत्र आहेत.

Story img Loader