नागपूर : पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विरोधात बहुतांश ठिकाणी काँग्रेसने बंडखोरी केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचारात सहकार्य केले जात नसल्याची ओरड होत आहे. यामुळे आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पूर्व नागपूर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांची प्रचारसभा घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकजूट दाखवली. परंतु, प्रत्यक्षात पेठे यांना एकट्याने किल्ला लढवायचा आहे. काँग्रेस पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादीला सोडायला तयार नव्हते. त्यातूनच या पूर्वमध्ये काँग्रेसमध्ये पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) आभा पांडे यांनी देखील बंडखोरी केली आहे. काँग्रेसला येथे सलग तीनदा पराभवाचा धक्का बसला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मात्र, त्यांना काँग्रेसचे नेते साथ देत नसल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा-महायुतीत नाराजी टाळण्यासाठीच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर?
दुसरीकडे काटोल मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख यांच्याविरोधात काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार यांची बंडखोरी केली. त्यामुळे महाविकास आघाडीमधील या जागेला फटका बसण्याची भिती आहे. रामटेक मतदारसंघाची जागा शिवसेनेची असताना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी येथे बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला धोका निर्माण झाला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसच्या वतीने पूर्व नागपुरात नेत्यांनी प्रचारात सक्रिय होण्यासाठी शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीत अनेक स्थानिक नेतेच अनुपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेत्याची नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याचे दिसून येते.