नाशिक – Sameer Bhujbal file independent candidature from Nandgaon Assembly Constituency महायुतीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात शिवसेनेनेही (एकनाथ शिंदे) उमेदवारांना एबी अर्ज दिले आहेत. माघारीसंदर्भात चर्चा सुरू असून चार नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढला जाईल, भाजपचेही बंडखोर माघार घेतील, असा विश्वास भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. नांदगावमधून शिंदे गटाविरुध्द समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी केली असला तरी त्यांच्या माघारीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून छगन भुजबळ यांना निरोप दिले जातील, असे संकेत महाजन यांनी दिले.

उत्तर महाराष्ट्रातील काही जागांवर महायुतीत बंडखोरी झाली आहे. काही ठिकाणी दोन पक्षांनी एबी अर्ज दिल्याचे महाजन यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत मान्य केले. तीनही पक्षांच्या नेत्यांकडून मार्ग काढला जाईल. बंडखोरांना पाठिंबा दिला जाणार नाही. केंद्रीय नेतृत्वाकडून बंडखोरी रोखण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे दिवाळी असतानाही बंडखोर आणि नाराजांशी आपण चर्चा करीत असल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. चांदवडमधील बंडखोर केदा आहेर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ARvind sawant and Shaina nc
Arvind Sawant : “शायना एन. सी. माझी जुनी मैत्रीण…”, ‘त्या’ वक्तव्यावरून अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण!
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा

हेही वाचा >>> Latur Assembly Constituency : लातूरमधील लिंगायत मतपेढीचा कल कोणाकडे ?

भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांनी भावाला उमेदवारी देण्यास सांगितले होते. वरिष्ठ पातळीवरून त्यांची उमेदवारी कायम ठेवली गेली. केदा आहेर हे निवडणूक रिंगणात राहिले तरी त्यांना कमळ हे चिन्ह मिळणार नाही. त्यामुळे केदा आहेर यांची समजूत काढून बंडखोरीवर तोडगा काढला जाईल, असे महाजन यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील वातावरण पूर्णत: वेगळे आहे. विरोधकांचे बनावट कथानकाचे वास्तव नागरिकांच्या लक्षात आले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पाच विधानसभा क्षेत्रात पुढे तर मालेगाव मध्यमध्ये पिछाडीवर राहिला. उत्तर महाराष्ट्रातील असे काही भाग वगळता महायुती सर्वत्र चांगली कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिक पूर्वमधील राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार गणेश गिते यांनी सादर केलेली ध्वनिफित बनावट आहे. या संदर्भात भाजपच्या उमेदवाराने पोलिसात तक्रार दिली असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून त्याची शहानिशा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार

छगन भुजबळ यांची भूमिका महत्वपूर्ण नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने महायुतीत बिघाडी झाली आहे. शिंदे गटाने अजित पवार गटाच्या अन्य दोन मतदारसंघात थेट अधिकृत उमेदवार देत प्रत्युत्तर दिले. समीर भुजबळ यांची बंडखोरी रोखण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांचे काका छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेवेळी भुजबळ यांनी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडून तिकीटासाठी आपले नाव निश्चित झाल्याचा दावा केला होता. पुतण्या समीर भुजबळ यांची बंडखोरी रोखण्यासाठी आता वरूनही तसाच निरोप येईल, असे महाजन यांनी सूचित केले.

Story img Loader