पवार जिंकले… पवार हरले !

३८ पैकी ३६ जागांवर ‘घड्याळा’ने ‘तुतारी’चा पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व मिळवल्याचे समाधान अजित पवारांना या निकालाने दिले…

NCP Ajit pawar win
पवार जिंकले… पवार हरले ! (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यातील ही लढाई होती. अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाच्या बंडखोर आमदारांना घरी बसवण्याचा निर्धार शरद पवारांनी केला होता. त्यासाठी १९८४ च्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या झालेल्या पराभवाचे उदाहरण पवार देत होते. लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकून शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली होती. विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावत्ती करून, जनतेचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचे शरद पवारांना अधोरेखित करायचे होते. महाराष्ट्रात स्वबळावर ६० आमदार निवडून आणण्याची ताकद असल्याचे यापूर्वी शरद पवारांनी दाखवून दिले होते. पण यंदा फक्त १० आमदार शरद पवारांच्या पक्षाने निवडून आले आहेत. शरद पवारांना हा मोठा धक्का आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी पक्ष बांधणीसाठी सारी सूत्रे हाती घेतली. गेल्या दीड वर्षांत पायाला भिंगरी लागल्यागत मोठ्या पवारांनी राज्यभर दौरे केले. अजित पवारांनी वैयक्तिक टीकाटिप्पणी केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले. पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाले. यामुळेच पक्षाचे नवीन नाव आणि तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह लोकांमध्ये अधिक नेण्याचे मोठे आव्हान होते. अजित पवार व त्यांच्या समर्थकांना चारी मुंड्या चीत करण्याची शरद पवारांची योजना होती. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपली ताकद दाखवूनही दिली होती. पण हे यश त्यांना विधानसभेत कायम राखता आले नाही.

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा :कोकण: कोकण, ठाण्यात महायुतीचे वर्चस्व, शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईत शिंदे गट वरचढ

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत फक्त एक खासदार निवडून आल्याने अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार हडबडले होते. पक्षात फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नीच्या पराभवामुळे आणखीच मोठा फटका बसला होता. अजित पवारांपुढे अस्तित्वाची लढाई होती. शरद पवारांचे दौरे, त्यातून पवारांकडून करण्यात येणारी टीका, लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद हे सारे अजित पवारांसाठी आव्हानात्मक होते. त्यातच महायुतीमध्ये अजित पवारांच्या वाट्याला अपेक्षित जागा आल्या नव्हत्या. पण या सर्व प्रतिकूल बाबी असतानाही अजित पवारांनी आव्हानांवर मात केली.

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवारांनी स्वत:ची प्रतिमा बदलण्यावर भर दिला. त्यासाठी दिल्लीतील निवडणूक रणनीतीकारांची मदत घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार गुलाबी रंग स्वीकारला. अजित पवार गुलाबी रंगाचे जाकीट परिधान करू लागले. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना सादर केल्यावर त्याचे सारे श्रेय स्वत:ला मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले गेले. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांवर केलेली टीका अंगलट आली होती. विधानसभा प्रचारात शरद पवारांवर टीकाटिप्पणी करण्याचे टाळले. उलट अन्य कोणी टीका केली तरी त्यांना दरडावले. महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अजित पवारांचे बिनसले होते. उभयतांनी परस्परांच्या मतदारसंघात काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पण महायुतीला मिळालेल्या यशात अजित पवारांचा राष्ट्रवादी तगला.

हेही वाचा :मुंबई : ठाकरेंची मक्तेदारी मोडीत, मुंबईवर भाजपची सरशी

काका शरद पवारांवर मात केल्याचे समाधान अजित पवारांना या निकालाने दिले. मतदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाकारून अजित पवारांच्या पक्षाला कौल दिला. उभय पक्ष परस्परांच्या विरोधात ३८ मतदारसंघांमध्ये लढले. यापैकी दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता अन्य सर्व मतदारसंघांमध्ये अजित पवारांचा पक्ष जिंकला आहे.

काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत पुतण्या जिंकला. बारामतीचा गड उभय बाजूने प्रतिष्ठेचा करण्यात आला होात. अजित पवारांनी हा ़गड कायम राखला. राष्ट्रवादीवर हक्क कोणाचा यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. पण जनतेच्या न्यायालयात अजित पवार जिंकले, असे चित्र निकालांतून उभे राहिले. अजित पवारांसाठी हा विजय महत्त्वाचा आहे. काकांची जागा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 ncp ajit pawar win ncp sharad pawar lost assembly election 2024 print politics news css

First published on: 24-11-2024 at 05:13 IST

संबंधित बातम्या