नाशिक : उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या ३५ जागांसाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. आदिवासीबहुल नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी मतदान जळगाव जिल्ह्यात झाले आहे. नाशिक जिल्ह्यात १५ विधानसभा मतदार संघांत मतदानाची टक्केवारी ६५ ते ६६ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीणमध्ये अधिक उत्साह होता.

हेही वाचा : मराठवाडा : आरक्षण, जरांगे आणि नातीगोती

Solapur woman voter turnout marathi news
सोलापुरात महिला मतदारांच्या टक्केवारीत वाढ, ‘लाडकी बहीण’चा परिणाम महायुतीला लाभदायक?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra vidhan sabha election Haryana pattern
राज्यात मतविभागणीचे ‘हरियाणा प्रारूप’?
Marathwada evm machines vandalized
हाणामारीबरोबर मतदान यंत्रे फोडली, मराठवाड्यात ६२ टक्क्यांहून अधिक मतदानाचा अंदाज
What Exit Polls Prediction About Raj Thackeray?
Maharashtra Exit Poll 2024 : राज ठाकरे किंगमेकर ठरणार? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?
konkan vidhan sabha voter turnout
कोकणात सुमारे टक्के ७० टक्के मतदान; मतदान प्रक्रिया शांततेत, चाकरमान्यांची मतदानाला हजेरी
muslim majority areas voting
मुंबईच्या काही भागांमध्ये निरुत्साह, मुस्लीमबहुल भागात तुलनेने अधिक मतदान
Devendra fadnavis mohan bhagwat meeting
फडणवीस-मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट

सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ६०.११ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या तासात टक्केवारीत पाच ते सहा टक्क्यांनी भर पडण्याचा अंदाज आहे. आदिवासी राखीव मतदारसंघात उत्स्फुर्त मतदानाची परंपरा कायम राहिली. जळगावमध्ये ६० टक्के, धुळे ६४, तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६८ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी नवापूर मतदारसंघात ७८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. धुळे जिल्ह्यात अंदाजे ६२ टक्के मतदान झाले. जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघात अंदाजे ६० टक्के मतदान झाले.