मुंबई : अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्यात धनगर समाजाचे प्रदीर्घ आंदोलन नुकतेच झाले असतानाही या समाजाच्या पदरी विधानसभा उमेदवारीसंदर्भात निराशा आली आहे. महायुतीने ४ आणि महाविकास आघाडीने ६ असे दोन्ही आघाड्यांनी केवळ १० धनगर समाजाचे उमेदवार उभे केल्याने या समाजात मोठी नाराजी आहे.

गेले चार महिने राज्यात धनगर समाजाचे आरक्षण आंदोलन धगधगत होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी पुरेशा संख्येने विधानसभा उमेदवारी दिली जाईल, अशी समाजाची अपेक्षा होती. या समाजाचे विधानसभेत एक आणि परिषदेत दोन आमदार होते.

Brahmin, Maharashtra assembly elections Brahmin,
धारावी प्रकल्पात मराठी माणसासाठी ७० ते ७५ टक्के घरे राखीव ठेवा, निवडणूकीच्या तोंडावर पार्ल्यातील संस्थेचा मराठीचा जाहीरनामा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
special quota in hostel admission has finally been cancelled
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी… वसतिगृह प्रवेशातील ‘विशेष कोटा’ अखेर रद्द…
beneficiary consumers ignoring to purchase home from affordable housing scheme
विश्लेषण : परवडणाऱ्या घरांचे गणित का बिघडले? लाभार्थी ग्राहक योजनांकडे पाठ का फिरवत आहेत?
Nana Patole, rebellion in Congress, Nana Patole news,
नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे, नेमके कारण काय?
Names of 10k genuine voters deleted in Maharashtra
राज्यातील नावे वगळून बाहेरची दहा हजार नावे मतदार यादीत ;  महाविकास आघाडीचा आरोप
st seats challenge for bjp in maharashtra
सोशल इंजिनिअरिंगमध्ये तरबेज असलेल्या भाजपाला आदिवासींच्या राखीव जागा जिंकण्यात अपयश? महाराष्ट्र-झारखंडमधील परिस्थिती काय?
mla Indranil Naik yayati naik
पुसद मतदारसंघासाठी ‘बंगल्यात’च रस्सीखेच; थोरले की धाकटे? नाईक कुटुंबात पेच

हेही वाचा :मनसुख हिरेनच्या हत्येची कल्पना फडणवीसांना होती! अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर

भाजपने ‘कर्जत-जामखेड’मध्ये राम शिंदे, जतमध्ये गोपीचंद पडळकर या धनगर नेत्यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने (अजित पवार) इंदापूरमधून दत्तात्रय भरणे आणि फलटणमध्ये सचिन कांबळे -पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे दोन्ही उमेदवार विधान परिषदेचे विद्यामान सदस्य आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने धनगर उमेदवार उभा केलेला नाही.

राष्ट्रवादीने (शरद पवार) करमाळ्यात नारायण पाटील, तर माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर या धनगर नेत्यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने ‘सोलापूर मध्य’मधून चेतन नरोटे आणि ‘औरंगाबद पूर्व’मध्ये लहु शेवाळे या धनगर नेत्यांना पसंती दिली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) धुळेमधून अनिल गोटे यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. सांगोलामध्ये बाबासाहेब देशमुख हे ‘शेकाप’चे उमेदवार आहेत.

हेही वाचा :‘मविआ’ला साथ देण्याचा रिपब्लिकन गटांचा निर्धार

राज्यात धनगर समाजाची सुमारे ९ टक्के लोकसंख्या असून ७२ विधानसभा मतदारसंघात या समाजाचे २२ ते २९ टक्के मतदार आहेत. एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाज मुख्यत्वे महाविकास आघाडीच्या पाठिीशी उभा राहिला होता, असा अंदाज आहे.

शिंदेंविरोधात रोष :

शिवसेनेने (एकनाथ शिंदे) धनगर समाजाला विधानसभेची उमेदवारी दिलेले नाही. त्यामुळे पंढरपुरातील होळकर वाड्यात धनगर समाजाच्या आंदोलकांनी नुकतीच एक बैठक घेत शिंदे शिवसेनेला मतदान करायचे नाही, अशी भंडारा हाती घेऊन शपथ घेतली आहे.

हेही वाचा :मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मनसेबरोबर काही जागांवर युती शक्य, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

आमची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणी झाली होती. विधानसभेला पुरेसे प्रतिनिधित्व देण्याचे त्यांनी मान्य केले होते. प्रत्यक्षात उमेदवार कमी दिले. दिल्यात त्या जागा पडणाऱ्या आहेत. समाज मतदानातून रोष प्रकट करेल.

  • बिरु कोळेकर, प्रवक्ता, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन विचार मंच.