यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमदेवार बिपीन चौधरी यांचे वाहन अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी पेटवून दिले. यवतमाळात यापूर्वी अनेक निवडणुकींमध्ये गरमागरमी झाली. मात्र या पद्धतीने दहशत पसरविण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने यवतमाळच्या निवडणुकीला गालबोट लागल्याची चर्चा शहरात आहे.

प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी यांचे येथील वडगाव परिसरातील गुरूकृपा नगरीत वास्तव्य आहे. शुक्रवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास ते, त्यांचे बंधू आणि समर्थक प्रचाराहून परतले. त्यानंतर रात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन करून त्यांचे चारचाकी वाहन जळत असल्याचे सांगितले. चौधरी यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा संपूर्ण वाहन आगीच्या ज्वाळांत लपेटले होते. घटनेची माहिती तत्काळ आपतकालीन क्रमांक ११२ वर देण्यात येवून अवधूतवाडी पोलिसांना कळविण्यात आले. राजकीय षडयंत्रातून वाहनावर पेट्रोल टाकून ते पेटवून देण्यात आल्याचा आरोप उमेदवार बिपीन चौधरी यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

bombay high court refuses to stop demolition of five illegal buildings in bhiwandi
बेकायदा घराची कागदपत्रेही अनधिकृतच; भिवंडीतील पाच बेकायदा इमारतींना संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
MCOCA Act information in marathi
‘मकोका’ कायदा काय आहे? या कायद्यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा बसला आहे का?
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
thieves stole Metro pole in Shivajinagar area are arrested
शिवाजीनगर भागात मेट्रोचे खांब चोरणारे गजाआड, सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?

हेही वाचा : मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…

माझे कुणाशीही मतभेद नाहीत. मी गेली निवडणूक प्रहारकडून लढलो. आरोग्य व सामाजिक क्षेत्रात माझे कार्य आहे. मला कुणबी समाजाचा वाढता पाठींबा मिळत असल्याने आपण यवतमाळ मतदारसंघात तिसरा पर्याय म्हणून पुढे आलो आहे. या कारणाने दोन्ही मोठ्या पक्षांच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत या गोष्टीचा धसका घेतल्याने विरोधकांनी ही घटना घडवून आणली असावी, असा आरोप चौधरी यांनी केला आहे. भाजप म्हणते की, काँग्रेसने गुन्हेगारीची सुरुवात केली आणि काँग्रेस म्हणते की भाजपने गुन्हेगारी वाढविली. घरासमोरील कार पेटविणे हा प्रकार गुन्हेगारांकडूनच झाला असावा. या घटनेतून मला इशारा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यवतमाळातील दोन्ही मुख्य उमेदवारांची पार्श्वभूमी तपासल्यास सत्य समोर येईल, असा टोलाही त्यांनी मारला. मला नुकतीच मुलगी झाली. ती केवळ सहा दिवसांची आहे. या घटनेमुळे माझे कुटुंबीय धास्तावले आहे. मात्र आपण अशा इशाऱ्यांना घाबरत नाही, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?

यवतमाळात निवडणूक प्रचार शिगेला पोचला असून आरोप, प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होण्याची चिन्हं असताना सर्व शाखेय कुणबी समाजाने सहविचार सभा घेवून प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी यांना समर्थन दिले. त्यात समाजातील एका गटाने अन्य उमेदवारासाठी अशीच सभा घेतली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिपीन चौधरी यांच्यावर दबाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेस यवतमाळला गुन्हेगारीमुक्त व निर्भय बनविण्याच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहे तर भाजपने ज्यांची सुरूवातच गुन्हेगारीने झाली त्यांना नैतिकता आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना थेट उमेदवाराचेच वाहन पेटविल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Story img Loader