पुणे : विधानसभा निवडणुकीत शहरासह जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत ३४ हजारांहून अधिक टपाली मतदान झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत टपाली मतदान दुपटीने वाढले आहे. मतदान सुरू होण्यापूर्वी सकाळी आठ वाजेपर्यंत ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम’अंतर्गत (ईटीपीबीएस) टपालाने प्राप्त होणाऱ्या मतपत्रिका ग्राह्य धरल्या जाणार आहेत. परिणामी, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होऊन अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन आणि उर्वरित भागात दहा, अशा एकूण २१ विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान प्रक्रियेवेळी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या, तसेच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान घेण्यात आले होते. सर्वाधिक पोलीस विभागातील २५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे. त्या पाठोपाठ निवडणूक कामकाजावर असलेल्या सहा हजार ६५८ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी, तर ८५ वर्षांपुढील एक हजार ८४४ ज्येष्ठ आणि ३१० दिव्यांग मतदारांनी घरबसल्या टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे.
हेही वाचा : मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुंबईत १० ठिकाणी केंद्रे; सुरुवातीला टपाल मतांची मोजणी
निवडणूक काळात प्रत्यक्ष कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र (इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट – ईडीसी) देण्यात येते. त्यानुसार, सहा हजार ९५८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र भरून देत टपाली मतदान केले आहे, तर लष्कर, केंद्र आणि राज्य सशस्त्र सेवेतील जवानांबरोबरच प्रशिक्षण किंवा शासकीय सेवेनिमित्त आणि परदेशात कार्यरत असलेल्या अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना ईटीपीबीएस उपलब्ध करून दिली आहे. अशा पाच हजार ६०५ मतदारांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत ६५० मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढल्याने मतदान केंद्रात झालेली वाढ, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेलमधील (व्हीव्हीपॅट) चिठ्ठ्यांची होणारी मोजणी यासह उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून मतमोजणीदरम्यान घेण्यात येणारे संभाव्य आक्षेप अशा विविध कारणांमुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब होण्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे.
हेही वाचा : नांदेडमध्ये ‘विक्रमादित्य’ कोण, उत्कंठा शिगेला!
पुणे जिल्ह्यातील टपाली मतदान
निवडणूक कामावर असलेले अधिकारी, कर्मचारी (ईडीसी) – ६,९५८
पोलीस अधिकारी-कर्मचारी (अर्ज क्रमांक १२) – २५,१०५
८५ वर्षांपुढील मतदार – १,८४४
अपंग मतदार – ३१०
सैनिक आणि परदेशातून ऑनलाइन मतदान – ६५०
उमेदवाराला टपाली मतदानाचा ‘आधार’
शहरासह जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कमी मताधिक्याने विजयी झालेले अनेक उमेदवार आहेत. यंदाच्या निवडणुकीत टपाली मतदानाचा टक्का दुपटीने वाढला आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघातील उमेदवारांच्या मतदानात कमी फरक आहे, अशा ठिकाणी उमेदवाराला टपाली मतदानाचा मोठा ‘आधार’ मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.