अहिल्यानगर : जिल्ह्यात एकेकाळी सर्वव्यापी असलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या कमकुवतपणाकडे जात असतानाच बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. असे असताना निवडणुकीत हेमंत ओगलेसारखा नवखा तरुण पक्षाचा झेंडा घेऊन श्रीरामपुरच्या अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर विजय मिळवतो हे काहीसे आश्चर्यजनकच!

महायुतीच्या झंझावातात काँग्रेसच्या चिन्हावर हेमंत ओगले हे एकमेव जिल्ह्यातून विजयी झाले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने बांधणी करावी लागेल, प्रत्येक तालुक्यात नवीन नेतृत्व शोधावे लागेल, अशी अपेक्षा हेमंत ओगले हे विजयी झाल्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त करतात. काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांच्या युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणूक ‘मॉडेल’च्या माध्यमातून हेमंत ओगले पुढे आले. युवक काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक म्हणून वेगवेगळ्या राज्यात काम करताना त्यांचा पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह, मोहन यांच्याशी संपर्क आला. त्याचाच उपयोग त्यांना यंदा विधानसभेची श्रीरामपुरमधून उमेदवारी मिळवण्यात झाला. विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकिट बदलून ते ऐनवेळी ओगले यांना देण्यात आले. विद्यमान आमदाराचे तिकिट कापण्याचा हा प्रयोग अद्भूत असाच होता. त्यामागे हेमंत ओगले यांचा युवक काँग्रेसमध्ये काम करताना वरिष्ठ नेत्यांशी आलेला संपर्क कामी आला.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Tensions rise after cattle parts found under Khed Devane bridge
खेड देवणे पुलाखाली गोवंशाचे अवयव सापडल्याने तणाव
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Increasing the height of Almatti Dam poses a flood risk to western Maharashtra
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका?
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
unauthorized construction, Shri Gopal lal Mandir temple, Mira Road,
मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

हेही वाचा : राष्ट्रवादीवादीसाठी फलदायी! परभणीत विटेकरांना लागोपाठ दुसरी आमदारकी

हेमंत ओगले तसे मूळचे श्रीगोंदा तालुक्यांतील पेडगावचे. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेत श्रीरामपुर अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याचे पाहून १७ वर्षांपूर्वी ते श्रीगोंद्यातून श्रीरामपुरला स्थलांतरीत झाले. सुरुवातीला काँग्रेसमध्ये ते विखे गटाचे म्हणून ओळखले जात. मात्र राधाकृष्ण विखे यांच्या समवेत भाजपमध्ये न जाता ते निष्ठावंताप्रमाणे काँग्रेसमध्येच थांबले. नंतर त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशीही जुळवून घेतले. स्थानिक ससाणे गटाच्या संघटनेशी जवळीक निर्माण केली. तीच त्यांना विधानसभा निवडणुकीत उपयोगी पडली.

ऐकेकाळी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. यशवंतराव चव्हाण यांनी डाव्या चळवळीतील अनेकांना काँग्रेसमध्ये आणले. सहकाराच्या माध्यमातून काँग्रेसची वीण घट्ट बसवली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर या बालेकिल्ल्याच्या तटबंदी ढासळल्या. विखे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर थोरात यांच्याकडे एकहाती नेतृत्व येऊनही पक्षाची जिल्ह्यातील परिस्थिती सुधारू शकली नाही. गेल्या निवडणुकीत पक्षाचे केवळ दोनच आमदार विजयी झाले होते. एक होते बाळासाहेब थोरात आणि दुसरे लहू कानडे. यंदा पक्ष जिल्ह्यात केवळ तीनच जागा लढवू शकला. त्यातील बाळासाहेब थोरात (संगमनेर) यांच्यासह शिर्डीच्या जागेवर पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र श्रीरामपुरच्या एकमेव जागेवर ओगले विजयी झाले. ओगले यांच्या रुपाने जिल्ह्यात काँग्रेस जीवंत राहीली.

हेही वाचा : अमरावती जिल्‍ह्यात यशानंतरही भाजपमध्‍ये संघर्षाची नांदी?

म्हणूनच ओगले म्हणतात, जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. प्रत्येक तालुक्यातून नवे नेतृत्व शोधून ते पुढे आणावे लागणार आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडीशा, तमिळनाडू आदी विविध राज्यात पक्ष निरीक्षक म्हणून काम केलेले ओगले सध्या प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पदी कार्यरत आहे.

Story img Loader