अलिबाग : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही कोकणात महायुतीने निर्विवाद वर्चस्व कायम राखले. १५ पैकी १४ जागा जिंकून महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. कोकणात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढ्यात शिंदे गट वरचढ ठरला. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे मतविभाजन महायुतीच्या पथ्यावर पडले, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपकडून आयात उमेदवारांना उमेदवारी देण्याची शिवसेना शिंदे गटाची कोंडी करण्याची ठाकरे गटाची खेळी निष्प्रभ ठरली.

शिवसेना शिंदे गटाचे आठ, भाजपचे चार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. गुहागरची जागा सोडली तर इतर सर्व जागा महायुतीने जिंकल्या. राजापूर, कुडाळ या दोन जागा महायुतीने महाविकास आघाडीकडून खेचून आणल्या. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील मतविभाजन महायुतीच्या पथ्यावर पडले. शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मतविभाजनाचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. कर्जत व उरणमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र दोन्ही मतदारसंघात शेवटी महायुतीचे उमेदवार विजयी झाले. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, महाडमधून भरत गोगावले, पेणमधून रविशेठ पाटील, अलिबागमधून महेंद्र दळवी, पनवेलमधून प्रशांत ठाकूर, उरणमधून महेश बालदी, तर कर्जतमधून महेद्र थोरवे विजयी झाले.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

हेही वाचा : मुंबई : ठाकरेंची मक्तेदारी मोडीत, मुंबईवर भाजपची सरशी

रत्नागिरी मतदारसंघात भाजपच्या बाळ माने यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची ठाकरे गटाची खेळी फसली. रत्नागिरीतून पुन्हा उदय सामंत निवडून आले. किरण सामंत यांनी राजापूरमध्ये राजन साळवी यांचा पराभव केला. त्यामुळे सामंत बंधूंनी रत्नागिरीतील राजकारणावर आपली पकड घट्ट केली. भाजपची नाराजी असूनही योगेश कदम पुन्हा निवडून आले, तर चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शेखर निकम यांनी वर्चस्व कायम राखले. गुहागरमधून ठाकरे गटाचे भास्कर जाधव विजयी झाले.

राणे कुटुंबाचे वर्चस्व

सिधुदुर्ग जिल्ह्यावर राणे कुटुंबाने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. कुडाळमधून नीलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आले, तर कणकवलीतून भाजपचे उमेदवार म्हणून नितेश राणे पुन्हा विजयी झाले. सावंतवाडी मतदारसंघात भाजपच्या राजन तेली यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची उद्धव ठाकरे यांची खेळी फसली. दीपक केसरकर यांनी त्यांचा सहज पाडाव केला.

हेही वाचा :उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात ३५ पैकी ३३ जागांवर महायुती

प्रमुख विजयी उमेदवार

●एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी – शिवसेना शिंदे)

●उदय सामंत (रत्नागिरी – शिवसेना शिंदे)

●दीपक केसरकर (सावंतवाडी – शिवसेना शिंदे)

●रविंद्र चव्हाण (डोंबिवली – भाजप)

●आदिती तटकरे (श्रीवर्धन- राष्ट्रवादी अ.प.)

●जितेंद्र आव्हाड (डोंबिवली – राष्ट्रवादी श. प.)

●संजय केळकर (ठाणे शहर-भाजप)

हेही वाचा : विदर्भ : विदर्भात महायुतीची लाट, विरोधक भुईसपाट

प्रमुख पराभूत उमेदवार

●राजन साळवी (राजापूर – ठाकरे गट)

●वैभव नाईक (कुडाळ – ठाकरे गट)

●राजन विचार (ठाणे शहर – ठाकरे गट)

●संदीप नाईक (बेलापूर – राष्ट्रवादी श.प.)

●नजीब मुल्ला (मुंब्रा-कळवा, राष्ट्रवादी अ.प.)

Story img Loader