छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी ठरणारा जरांगे यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीमध्ये किती प्रमाणात टिकतो, ‘लाडकी बहिणी’चे मतदान नक्की कोणाच्या पारड्यात याची मराठवाड्यात उत्सुकता आहे. तसेच भाजपची मराठवाड्यातील शक्ती वाढणार की घटणार, शिवसेनेचा बालेकिल्ला असणारे संभाजीनगर आणि मराठवाडा उद्धव ठाकरेंच्या बाजूला थांबणार की एकनाथ शिंदेंच्या, याचा निर्णयही विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात निकालाचे औत्सुक्य वाढले आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील काही मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांची चर्चा मतदानानंतर सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ मध्ये सर्वाधिक १६ जागा मिळविणाऱ्या भाजपला आपली राजकीय शक्ती मराठवाड्यात टिकवण्याचे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात ‘मराठा-मुस्लीम आणि दलित’ अशी मतपेढी तयार झाली होती. ही मतपेढी विधानसभा निवडणुकीमध्ये राहणार नाही, असा दावा केला जात होता. महायुतीमध्ये भाजपने मराठवाड्यात २०१९ च्या तुलनेत चार जागा कमी लढल्या. २० जागांवर उमदेवार उभे करणाऱ्या भाजपला जरांगे यांचा विरोध असल्याचे संदेश देण्यात आले होते. अशा स्थितीमध्ये ‘लाडकी बहीण’च्या माध्यमातून महिला मतदारांना महायुतीने साद घातली.

हेही वाचा :तावडे यांची राहुल गांधी, खरगेंना नोटीस

पाच मंत्र्यांच्या मतदारसंघात काय होणार?

● राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे मंत्री अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, तानाजी सावंत, अतुल सावे यांच्या मतदारसंघातील निर्णयाबाबत अधिकची उत्सुकता आहे.

● या मतदारसंघातील मतदानाची आकडेवारीही वारंवार चर्चेत आहे. ती अशी : सिल्लोड -८०.८ (७९.४१), परळी – ७५.२७ ( ७३.०२), उदगीर ६७.११ (६७.२२), परांडा ६९.८३ (६८.६३), औरंगाबाद पूर्व ६०.६३ (५८.९९).

(कंसातील आकडे महिला मतदारांचे आहेत.)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 result manoj jarange patil ladki bahin yojana impact print politics news css