बुलढाणा: प्रमुख पक्षांच्याअधिकृत उमेदवारांसमोरील बंडखोर आणि उपद्रव मूल्य असलेल्या अपक्षांची डोकेदुखी कायमच राहण्याची चिन्हे आहे. उमेदवारांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या दृष्टीने केलेले अविरत प्रयत्न फारसे सफल ठरत नसल्याचे  वृत्त आहे. दुसरीकडे ‘हाय कमांड’ देखील फारसे गंभीर नसल्याने  सिंदखेड राजा मतदारसंघात घड्याळ विरुद्ध धनुष्य अशी मैत्रीपूर्ण लढत अटळ असल्याची चिन्हे आहे.   

मोठ्या प्रमाणात उफाळून आलेली बंड खोरी आणि सुनियोजितपणे  मैदानात उतरवण्यात आलेले मोठ्या संख्येतील अपक्ष यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
maharashtra vidhan sabha election 2024 rebels certain in five constituencies of amravati district
Rebellion In Amravati District :अमरावती जिल्‍ह्यात पाच ठिकाणी बंडखोरी अटळ
halba community candidates in three constituencies in nagpur against bjp and congress
हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार 
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”
Challenges facing by shinde shiv sena candidate in Maharashtra state assembly elections 2024
Ambernath Assembly Constituency : अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांच्या अडचणीत वाढ

नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदती नंतर लगेच याची जाणीव  झाल्याने महायुती आघाडीच्या चौदा उमेदवारांनी यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. रिंगणातील अपक्षांची संख्या , त्यातील बहुतांश ‘चळवळी’तील , अल्पसंख्याक  आणि ‘मायक्रो -ओबीसी’ असणे या बाबी ‘हरियाणा पॅटर्न’ शी मिळत्या जुळत्या ठरल्या आहे. यंदाच्या सात मतदारसंघातील लढती दुरंगी असो वा बहुरंगी, मात्र या जागांचे निकाल कमी मताधिक्य ने लागण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या बंडोबा वा मोठ्या संख्येतील अपक्षांमुळे होणारे मतविभाजन  आघाडी साठी धोक्याची घंटा आहे.

हेही वाचा >>> बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा

भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी चे वरिष्ठ नेते थेट निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांच्या स्वबळावरील मनधरणीच्या प्रयत्नांना   फारसे यश मिळाले नसल्याचे वृत्त आहे. चुरशीच्या लढतीत प्रचार सोडून मनधरणी करण्यात वेळ जाणे परवडणारे नाही.यापरिनामी लढतीत देखील बंडोबा आणि अपक्ष उमेदवारांची डोकेदुखी कायम राहिल असेच चित्र आहे.

हेही वाचा >>> Ambernath Assembly Constituency : अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांच्या अडचणीत वाढ

मातृतीर्थात भाजपची भूमिका निर्णायक

सिंदखेड राजा मतदारसंघातील तिढा आजअखेर कायम आहे. ‘अजितदादा गट कोणत्याही स्थितीत मागे हटायला तयार नाही आणि शिवसेना शिंदे लढण्यावर ठाम’ आहे. त्यामुळे   मैत्रीपूर्ण लढत अटळ असल्याचे चित्र आहे.या स्थितीत भाजप कोणत्या मित्रा सोबत उभे राहते हा महत्वाचा घटक ठरणार आहे. दुसरीकडे मतदारसंघात अर्ज भरणारे भाजपचे सुनील कायंदे आणि अन्य दोघे जण माघार घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

बुलढाणा चिखलीवर खलबते

बुलढाण्यातील शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांच्याविरोधात भाजपचे लोकसभा समन्वयक , माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंड पुकारले आहे. मागील दोन तीन दिवसापासून मुंबईत तळ ठोकून त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीगाठी घेतल्या.

शनिवारी रात्री बुलढाण्यात  आल्यावर  रविवारी दुपारी ते पुन्हा तातडीने मुंबईला रवाना झाले. प्रवासादरम्यान ‘लोकसत्ता’ सोबत बोलताना त्यांनी मुंबई वारीची पुष्टी केली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा निरोप आल्याने आपण मुंबईला जात असून त्यांच्या सोबतच्या चर्चेनंतर ‘निर्णय ठरेल’ असे त्यांनी स्पष्ट केले. बुलढाण्यात शिंदे यांनी अर्ज दाखल केल्यावर  आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी चिखलीत भाजपा उमेदवार श्वेता महाले यांच्याविरोधात अर्ज भरला.यामुळे आज रात्रीच्या बैठकीत चिखली आणि बुलढाण्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मेहकर, मलकापूर चे काय?

दरम्यान मेहकर मध्ये आघाडीचे सिद्धार्थ खरात(ठाकरे गट) यांच्या विरोधात बंड पुकारात काँग्रेसचे लक्ष्मण घुमरे,  ठाकरे गटाचे गोपाल बछिरे यांनी अर्ज दाखल केले. यापैकी घुमरे माघार घेण्याची शक्यता आहे. मात्र मलकापूर मधील काँग्रेस बंडखोर हरीश रावळ माघार घेण्याचा मनस्थितीत नसल्याचे आणि त्यांनी जय्यत तयारी केल्याचे चित्र आहे.