त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली

राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या नेतेमंडळींनी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले आहे. राज ठाकरे हे सहकुटूंब आले होते.

maharashtra vidhan sabha election 2024, candidates, worship, trimbakeshwar
त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली ( छायाचित्रात उमेदवार हिरामण खोसकर ) ( छायाचित्र – लोकसत्ता टीम )

नाशिक : निवडणूक जिंकण्यासाठी साम-दाम-दंड, भेद या नीतीचा वापर नवीन नाही. यामध्ये आता धार्मिक अनुष्ठान हा पदर देखील जोडला गेला आहे. विधानसभेच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आपल्या कर्तबगारीपेक्षा धार्मिक आधार महत्वाचा वाटू लागल्याने त्र्यंबक नगरीकडे अशा मंडळींची ये-जा वाढली आहे. विजयासाठी देवाला साकडे, पूजाविधी, अनुष्ठान केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे देश-विदेशातून पर्यटक, भाविक पूजाविधी, अनुष्ठान करण्यासाठी येत असतात. यामध्ये नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राध्द, कालसर्प शांती अशा अनेक विधींचा समावेश आहे. चांगल्या ठिकाणी बदली वा बढतीसाठी विशिष्ट विधी करणारे शासकीय अधिकारी असोत किंवा व्यावसायिक भरभराटीसाठी यज्ञयाग करणारे विकासक, व्यापारी असोत. यांचा त्र्यंबक नगरीत नेहमीच राबता असतो, असे स्थानिक पुरोहितांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. महिना, दीड महिन्याच्या काळात राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या नेतेमंडळींनी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले आहे. राज ठाकरे हे सहकुटूंब आले होते.

विधानसभेच्या जागा वाटपानंतर राज्यातील अनेक मतदारसंघात नाराजी उफाळून आली. तिचे रुपांतर बंडखोरीतही झाले. या राजकीय घटनाक्रमात त्र्यंबकेश्वरमध्ये विजयासाठी अनुष्ठान, पूजा विधी करणाऱ्यांची संख्या अकस्मात वाढली. राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार, बंडखोर, अपक्ष उमेदवार विजयासाठी कोणते अनुष्ठान करावे, अशी विचारणा पुरोहितांकडे करीत आहेत. अजित पवार गटाचे उमेदवार तथा स्थानिक आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात पूजाविधी केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या बंडखोर माजी आमदार निर्मला गावित याही मागे राहिल्या नाहीत. त्यांनीही त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली.

काही राजकीय मंडळींची विजयासाठी कुठलेही अनुष्ठान करण्याची तयारी असल्याकडे त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी लक्ष वेधले. त्र्यंबकेश्वर येथील अनेक पुरोहितांकडे तसेच पिढीजात गुरुंकडे सध्या विजयी संकल्प, अनुष्ठान करण्यात येत आहेत. यासाठी साधारणत: पाच हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. अर्ध्या तासांहून अधिक वेळ त्यासाठी द्यावा लागतो. अनेक उमेदवार याविषयी विचारणा करीत असून काहींनी अनुष्ठान पूर्णही केले आहे. आम्ही सर्वधर्मसमभाव जपतो, असे म्हणणारी काही नेते मंडळीही या अनुष्ठानासाठी उत्सुक असल्याचे गायधनी यांनी नमूद केले.

हे ही वाचा… सोलापुरात मोदी, उद्धव ठाकरेंच्या एकाच दिवशी प्रचारसभा

अनुष्ठान कसे करतात ?

त्र्यंबकेश्वर येथे पुरोहितांकडून विजयासाठी अनुष्ठान करण्यात येते. अनुष्ठानासाठी येणाऱ्या उमेदवाराची पत्रिका पाहून कोणते ग्रह अनुकूल आणि त्रासदायक आहेत याची माहिती घेतली जाते. प्रतिकूल ग्रहांची अनुकूलता लाभावी, यासाठी नवग्रह अनुष्ठान करण्यात येते. यानंतर महामृत्युंजय मंत्र, नवचंडी अनुष्ठान करण्यात येते. विजयी झाल्यानंतर विजयी यज्ञ होतो, असे पुरोहितांकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 the crowd of candidates for worship increased in trimbakeshwar print politics news asj

First published on: 07-11-2024 at 17:27 IST