अंबरनाथ: अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात मनसेने उमेदवार उभा केला नसला तरी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना मदत करण्याचे सूतोवाच केले आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याचे संकेत दिले आहेत. या घडामोडींमुळे शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ बालाजी किणीकर यांना कडवी लढत द्यावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला शिवसेनेतून किणीकर यांना अंतर्गत विरोध होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यात मध्यस्थी केल्याने दोन्ही गट एकत्र आले. किणीकर यांचा अर्ज दाखल करताना दोन्ही गटांनी आपली ताकद आणि एकता दाखवली. मात्र दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे मतभेद आहेत. त्यामुळे हे मतभेद मिटून त्याचे रूपांतर मतांमध्ये होतील का असा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अंबरनाथ विधानसभेत चांगली मते मिळाली. कोणतीही संघटनात्मक बांधणी किंवा ताकद नसताना मिळालेली ही मते शिवसेना शिंदे गटासाठी धोक्याची घंटा होती.

maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
thane assembly constituency sanjay kelkars strength with candidature of ubt rajan vichare for maharashtra vidhan sabha election 2024
Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra assembly election 2024 BJP rebel Dadarao Keche moved out of Maharashtra
आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले

हेही वाचा >>> शिंदे की ठाकरे, खरी शिवसेना कुणाची? हे ४९ मतदारसंघ ठरविणार दोन्ही गटांचे भवितव्य

या मतदारसंघात मनसेची ताकद लक्षणीय आहे. येथे मनसेने उमेदवार दिला नाही. मात्र लोकसभेत शिवसेना शिंदे गटासोबत काम करणाऱ्या मनसेला स्थानिक शिंदे गटाच्या नेत्यांनी विश्वासात घेतले नाही. त्यामुळे नुकत्याच मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करू असे सूतोवाच केले. ठाकरे गटाने येथे राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. वानखेडे आणि पाटील मनसेचे कुणाल भोईर यांच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी पाटील यांनी बोलताना वानखेडे हे आपले मित्र असून त्यांना मदत करूच. पक्ष काय निर्णय घेतो तेही पाहू असे वक्तव्य केले. त्यामुळे मनसे अंबरनाथ विधानसभेत ठाकरे गटाला मदत करणार असल्यास त्याचा फटका बालाजी किणीकर यांना बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> Bjp Candidate In Arvi Assembly Constituency : भाजपचा राज्यातील सर्वात ‘लाडका’ उमेदवार, त्याच्यासाठी वाट्टेल ते

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने येथे उमेदवार दिला आहे. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच येथे उमेदवार देऊ नका, असे आवाहन पक्ष श्रेष्ठींना केले होते. तरीही उमेदवार दिल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजी आहे. ज्यांना उमेदवारी दिली ते तीन वर्षापासून सक्रिय नाहीत. त्यामुळे वंचित बी टीम असल्याचा दावा करत दुसऱ्याच उमेदवाराला मदत होणार असल्याचे आरोप स्थानिक पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना पाठिंबा देणार असून त्यांचा प्रचार करण्याचे जाहीर केले आहे. वंचितची मते ठाकरे गटाकडे गेल्यास त्याचा अप्रत्यक्ष फटका बालाजी किणीकर यांना बसणार असल्याचे बोलले जाते. या दोन घडामोडींमुळे शिवसेनेचे उमेदवार बालाजी किणीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader