भंडारा : जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रांपैकी तुमसर मतदारसंघाची निवडणूक यावेळी सर्वार्थाने वेगळी आहे. येथे वरकरणी ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ किंवा ‘तेली विरुद्ध तेली’ असा सामना दिसत असला तरी यंदा जातीय गणित, पक्ष किंवा चिन्ह हे दुय्यम स्थानी असून उमेदवारच केंद्रस्थानी आहेत.

तब्बल वीस वर्षे हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. मात्र, २०१९ मध्ये ही जागा राष्ट्रवादीने भाजपकडून हिसकावून घेतली. तेव्हा भाजपचे प्रदीप पडोळे तिसऱ्या क्रमांकावर होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार राजू कारेमोरे आणि भाजपचे बंडखोर अपक्ष चरण वाघमारे यांच्यात केवळ ७ हजार ७०० मतांची तफावत होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून चरण वाघमारे आणि अजित पवार गटाकडून राजू कारेमोरे यांच्यात थेट लढत आहे. याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले धनेंद्र तूरकर हेही रिंगणात आहेत. ते पोवार समाजाचे प्रतिनिधित्व करतात. २००९ मध्ये खासदार शिशुपाल पटले यांच्यानंतर पहिल्यांदाच पोवार समाजाचा उमेदवार रिंगणात आहे. दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बंडखोर ठाकचंद मुंगुसमारे आणि साकोलीतून आयात झालेले सेवक वाघाये, अशी अपक्ष उमेदवारांची मांदियाळीसुद्धा येथे दिसून येत आहे.

Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
former MLA ratnagiri Rajan Salvi subhash bane Ganpat Kadam
राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन आमदार…
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

हेही वाचा : Nagpur Assembly Election 2024: भाजप स्टार प्रचारकांच्या सभा फक्त पक्षाच्या उमेदवारांसाठीच, महायुतीतील घटक पक्षाकडे दुर्लक्ष

तुमसर विधानसभेत कुणबी, तेली, पोवार आणि त्या खालोखाल दलित व अन्य समाजाचे मतदार आहेत. कुणबी आणि तेली समाजाने संपूर्ण मतदार संघावर वर्चस्व ठेवले आहे. त्या तुलनेत पोवार, दलित, अनुसूचित जाती- जमाती, मुस्लीम यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळताना दिसत नाही; मात्र निवडून येण्यासाठी उमेदवारांना याच समाजातील मतदारांचा आधार घ्यावा लागतो. या निवडणुकीत काही ठिकाणी पक्षांचे तर काही ठिकाणी विविध जातींच्या मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. विकासाचे मुद्दे, जातीय समीकरण, उमेदवाराला पसंती आणि नापसंती, हे महत्त्वाचे घटक ठरणार आहेत.

भंडाऱ्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नेते यांचे वाघमारे यांना पाठबळ आहे. यामुळे मोहाडी, तुमसरमधील कार्यकर्तेही वाघमारे यांच्या सोबत आहेत. शिवाय विकास फाऊंडेशनचे ५० ते ६० हजार कार्यकर्ते, पारंपरिक काँग्रेसची मते, विशेषतः मोहाडी तालुक्यातील काँग्रेस मतदार वाघमारे यांच्याच पाठीशी उभा राहील, असे बोलले जाते.

हेही वाचा : Gondia Assembly Election 2024 : गोंदियातील राहुल गांधींची सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तारणार?

दुसरीकडे, अजित पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार कारेमोरे यांना पक्षाने दुसऱ्यांदा संधी दिली आहे. मुळात अजित पवार आणि आमदार परिणय फुके यांच्या अट्टाहासामुळे कारेमोरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांचा त्यांना विरोध होता, असे राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कारेमोरे यांना राष्ट्रवादीसोबतच भाजपच्या पारंपरिक मतांचा फायदा होऊ शकतो. या क्षेत्रात कारेमोरे यांची लोकप्रियता असली तरी विकासाचे मुद्दे, उद्योगात उदासीनता, सिंचनाचा प्रश्न, महिला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी असभ्य भाषेत बोलणे, अशा काही बाबी त्यांच्यासाठी मारक ठरू शकतात.

या मतदारसंघात मतदारांच्या दृष्टीने उमेदवार हाच केंद्रस्थानी असल्याने कारेमोरे आणि वाघमारे यांच्यात तुल्यबळ लढत आहे.

हेही वाचा : Akola West Assembly Constituency : ‘अकोला पश्चिम’मध्ये धार्मिक राजकारणाचा ज्वर चढला

पूर्व विदर्भातील धानाचे कोठार

पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून तुमसर-मोहाडी तालुक्यांची ओळख आहे. तांदळाची भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील सर्वांत मोठी बाजारपेठ तुमसर शहरात आहे. या शहरातून दोन खासदार दिल्लीत गेले. राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून तुमसर शहराची ओळख आहे. संपन्नता लाभलेला परंतु विकासाकरिता आतुरलेला असा हा मतदार संघ. भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक संपन्नता तुमसर मतदारसंघाला लाभली. वैनगंगा, बावनथडी नदी, सोंड्या सिंचन योजना, मोठे तलाव येथे आहेत. परंतु येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत विशेष फरक पडला नाही. मॅग्निजच्या जगप्रसिद्ध खाणी या तालुक्यात आहेत. परंतु सर्वसामान्यांना त्यांचा काहीच फायदा नाही. रेल्वे या मतदारसंघातून जाते. आंतरराज्यीय सीमा मतदारसंघाला भिडल्या आहेत. तुमसर- रामटेक या नव्या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. सराफा बाजार हे दुसरे मोठे वैशिष्ट्ये तुमसरचे आहे.

Story img Loader