अकोला : विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीला बंडखोरी थोपवण्यात अपयश आले. त्यामुळे वाशीम, रिसोड व कारंजा मतदारसंघात तिरंगी-चौरंगी सामने होत आहेत. जातीय व मतविभाजनाचे समीकरण कुणाच्या पथ्यावर पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव वाशीम मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात चुरशीचा सामना आहे. भाजपने विद्यमान आमदार लखन मलिक यांची उमेदवारी कापली. श्याम खोडे यांना संधी दिली. त्यातच कार्यकारिणीत देखील बदल केला. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आहे. दुसरीकडे गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या तिकीटावर दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे डॉ. सिद्धार्थ देवळे शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात आहेत. वंचितने येथे पर्याय दिला. गेल्यावेळी अपक्ष लढून ४५ हजारावर मते घेणारे शशिकांत पेंढारकर पुन्हा एकदा अपक्षच लढत आहेत. वाशीममध्ये मतविभाजन होईल. अंतर्गत नाराजीवर मात करून समीकरण जुळवण्याचे उमेदवारांपुढे आव्हान आहे.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
Rebel Vani Umarkhed, Mahayuti Vani, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडी, महायुतीतील बंडखोरांना घरचा रस्ता
Washim District, maha vikas aghadi, mahayuti
वाशीम जिल्ह्यात तिरंगी-चौरंगी सामने; जातीय समीकरण, मतविभाजन कुणाच्या पथ्यावर?
NCP Sharad Pawar trumpet symbol in Solapur district 6 Constituency assembly elections 2024
सोलापुरात शरद पवार गटाला ‘ट्रम्पेट’ चिन्हाचा घोर; सर्व सहा मतदारसंघांत ‘ट्रम्पेट’ चिन्ह सक्रिय
khanapur vidhan sabha
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत
sangli vidhan sabha 2024
बंडखोरीने सांगलीतील तीन लढती लक्षवेधी!

हेही वाचा >>>लक्षवेधी लढत : बहिणीमुळे अवघड वाट, त्यात बंडखोरांचे गतिरोधक

रिसाेड मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरत आहे. माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत काँग्रेसचे अमित झनक यांना कडवी झुंज दिली होती. त्यानंतर रिसोडमधून उमेदवारी मिळण्याच्या आशेवर देशमुख पुत्रांसह भाजपवासी झाले. मात्र, हा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गट लढत आहे. त्यामुळे देशमुखांनी बंडखोरी केली. गेल्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा ते अपक्ष म्हणून मैदानात आहेत. त्यांच्यासह काँग्रेसचे अमित झनक, शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यात सामना आहे. वंचितने येथे मराठा उमेदवार दिला. प्रमुख तीन उमेदवार मराठा समाजाचे असल्याचे मतविभाजन अटळ मानले जाते. भाजप छुप्या पद्धतीने अनंतराव देशमुखांच्याा पाठीशी असल्याचा आरोपही शिवसेनेकडून झाला. रिसोडमध्ये महायुतीत कुरबुरी आहेत.

हेही वाचा >>>ठाणे, पालघरवर महायुतीची भिस्त

कारंजा मतदारसंघात महायुतीमध्ये तडजोड झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सई डहाके यांनी पक्षांतर करून भाजपची उमेदवारी मिळवली, तर भाजपतील दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतली. वंचित आघाडीने देखील ऐनवेळी उमेदवार बदलून माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे पुत्र सुनील धाबेकर यांना संधी दिली. युसूफ पुंजानी एमआयएमवर, तर नाईक परिवारातील ययाती नाईक रिंगणात आहेत. कारंजामध्ये चौरंगी लढतीचा अंदाज आहे.

वरिष्ठ नेत्यांकडून प्रचाराचा धुरळा

वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाने प्रचार सभा घेऊन प्रचाराचा धुरळा उडवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, ॲड. प्रकाश आंबेडकर आदी वरिष्ठ नेत्यांनी आपआपल्या उमेदवारांसाठी प्रचार केला.