Salil Deshmukh vs Anil Deshmukh Katol Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र सलील देशमुख निवडणूक लढवत आहेत.त्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने या मतदारसंघात ‘अनिल देशमुख’ या नावाचा व्यक्ती शोधून त्यांचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसकडून(अजित पवार) दाखल केला. ही मोहीम अत्यंत गुप्त राखण्यात आली. अर्जाची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अनिल देशमख (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचेनाव होते. तेव्हा ही बाब उघड झाली. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाविुद्ध अर्ज दाखल करणारे दुसरे अनिल देशमुख आहेत कोण? ते काय करतात ? याबाबत चर्चा सुरू झाली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांनी स्वत: न लढता पुत्र सलील यांना रिंगणात उतरवले. त्यांच्या विरुद्ध भाजपने चरणसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. काटोलमध्ये विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने ही जागा महायुतीत अजित पवार गटासाठी सुटेल , अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. अजित पवार यांनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे काटोलमध्ये भाजप विरुद्ध कग्रेस अशीच लढत होईल, असेच चित्र अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत होते.

Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
congress observers mla ram mohan reddy
Hingoli Assembly Constituency : काँग्रेसच्या निरीक्षकांना भेटण्यास माजी आमदार गोरेगावकरांचा नकार, लढवण्यावर ठाम
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

पडद्याआड सुरू होत्या हालचाली

वरवर काटोल मतदारसंघात घडणाऱ्या राजकीय घडामोडी सामान्य स्वरुपाच्या दिसत असल्या तरी पड़द्याआड देशमुख यांच्या विरुद्ध भाजपकडून हालचाली सुरूच होत्या. देशमुख यांनी स्वत: अर्ज दाखल केला असता तर त्यांच्या अर्जावर आक्षेप घेण्याची तयारी करण्यात आली होती. हे खुद्द अनिल देशमुख यांनीच सांगितले. घ्यायचा, त्यांनी अर्ज न भरता पुत्र सलील यांनीमतदारसंघात अर्ज दाखल केला तर वेगळी खेळी खेळायची यासाठी प्रयत्न सुरू होते. लोकसभा निवडणुकीत्यांच्यात अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्द त्यांच्या नामसाधर्म्य उमेदार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हासारखीच पिपाणी हे चिन्ह अपक्षांना मिळाले होते. यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या मतांची विभागणी झाली होती. या शिवाय एकसंघ राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह हे घड्याळ असल्याने अजूनही शरद पवार म्हणजे घडड्याल असा अर्थ घेऊन काही मते अजित पवार गटाला जातात हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. तिच खेळी काटोलमध्ये खेळण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाचे दुसरे अनिल देशमुख शोधण्यात आले. त्यांच्या नावाचा अर्ज दाखल केला व तो वैध ठरला.

हे ही वाचा… Naigaon Assembly Constituency : जुन्या भागीदारांचे राजकीय वारस आमने-सामने !

‘हे अनिल देशमुख” कोण आहेत ?

काटोल मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शोधलेले दुसरे अनिल देशमुख हे नरखेड तालुक्यातील थूगाव(निपानी) येथील रहिवासी आहेत. ते मजूर आहेत. त्यांचे थूगाव येथे छोटसे राहते घर आहे. त्याची किंमत ४.८८ लाख आहे. त्यांच्याकडे वीस हजार रुपयांची रोकड आहे.अशी माहिती त्यांच्या निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात दिली आहे. हे अनिल देशमुख हे भोयर पवार समाजाचे आहेत. हा समाज भंडारा जिल्ह्यातून स्थलातंरित झाला आहे. नागपूरमध्ये नरखेड तालुक्यात, वर्धा जिल्ह्यात कारंजा ,आष्टी तालुक्यात व भंडारा-गोंदिया जिल्ह्यात बहुसंख्येने आहेत. या समाजाचा समावेश ओबीसीत होतो. मात्र केंद्र सरकारने नुकताच त्यांचा समावेश केंद्राच्या ओबीसी सूचित केला आहे.

हे ही वाचा… Hingoli Assembly Constituency : काँग्रेसच्या निरीक्षकांना भेटण्यास माजी आमदार गोरेगावकरांचा नकार, लढवण्यावर ठाम

एबी फॉर्म विशेष विमानाने

अत्यंत गोपनीयता पाळून सलील देशमुख यांच्या विरुद्ध त्यांच्या वडिलांच्या नामसाधर्म्य दुसऱ्या अनिल देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तो राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नावाने आहे. अर्ज तपासणीच्या दिवशी या अर्जासोबत लागणारा पक्षाचा एबी फॉर्म विमानाने मुंबईतून काटोलमध्ये पाठवण्यात आला. तो देशमुख यांच्या अर्जाला जोडण्यात आला. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचे घड्याळ ह चिन्ह मिळू शकते. तसे झाले तर सलील देशमुख यांना त्याचा फटका बसू शकतो. कारण काटोल मतदारसंघात अनिल देशमुख म्हणजे घ़ड्याळ असेच समीकरण तयार झाले आहे. पहिल्यांदाच ते तुरारीवर लढणार होते.

अनिल देशमुख गावातून बेपत्ता ?

काटोलमधून घड्याळ चिन्हावर लढणारे अनिल देशमुख यांची निवडणुकीतील उमेदवारी उघड होताच ते गावातून बेपत्ता झाले. त्यांचे घर बंद आहे. व त्यांनी जो भ्रमणध्वनी क्रमांक शपथपत्रात दिला तो सुद्धा बंद आहे. ते सध्या नॉटरिचेबल झाले आहेत.

Story img Loader