ठाणे : पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ७२ हजारांच्या आसपास मते घेणारे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांची यंदाच्या प्रचारात जोरदार हवा निर्माण केली होती. असे असले तरी निकालात त्यांची पिछेहाट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना कमी मिळालेली मते आणि दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेल्याने जाधव यांची केवळ प्रचारातच हवा होती, असे आता निकालातून स्पष्ट होत आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर, ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात तिरंगी लढत होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय केळकर विरुद्ध अविनाश जाधव असा सामना झाला होता. या निवडणुकीत केळकर यांना ९२ हजार २९८ मते मिळाली होती तर, जाधव यांना ७२ हजार ८७४ मते मिळाली होती. या अटीतटीच्या लढतीत केळकर हे १९ हजार मतांनी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही केळकर आणि जाधव हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातच या मतदारसंघातून २००९ मध्ये आमदार राहिलेले ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या तिरंगी लढतीमुळे निवडणुकीची रंगत वाढली होती.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यात महायुतीचेच वर्चस्व; लाडक्या बहिणींची कमाल, तीन जागी भाजप, एका जागेवर अजित पवार गटाचा विजय

अविनाश जाधव यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार केला होता. ठाणे स्थानकात फलक हातात घेऊन त्यांनी प्रचार केला होता आणि एकदा निवडून देण्याची संधी मागितली होती. मनसे प्रमूख राज ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा झाल्या. शर्मिला ठाकरे यांनी चौक सभा घेतल्या होत्या. एकूणच प्रचारातील वातावरण निर्मितीमुळे मनसेची प्रचारात हवा दिसून येत होती. जाधव हेच बाजी मारतील आणि पराभूत झाले तर विचारे यांच्यापेक्षा जास्त मते घेतील अशा चर्चा रंगल्या होत्या. प्रत्यक्षात निकालानंतर मनसेची प्रचारात केवळ हवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत संजय केळकर हे ५८ हजार २५३ इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गेल्या निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ७२ हजारांच्या आसपास मते अविनाश जाधव यांनी मिळवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांची मागच्यावेळीपेक्षा कमी म्हणजेच ४२ हजार मते जाधव यांना मिळाली असून त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजेच ६२ हजार मते राजन विचारे यांना मिळाली आहेत. त्यामुळे मनसेची ठाण्यात पिछेहाट झाल्याचे समोर आले असून जाधव यांची केवळ प्रचारातच हवा होती, असे आता निकालातून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा – गडचिरोलीत एक दशकानंतर काँग्रेसला संधी, आरमोरीची जागा गमावल्याने भाजपला धक्का

ठाणे शहर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात पाचपाखाडी, चंदनवाडी, भक्ती मंदिर, नौपाडा, विष्णू नगर, गोखले रोड, गावदेवी, हंस नगर, खोपट, कोलबाड, उथळसर, गोकुळ नगर, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटल, पोलीस लाईन जरी मरी, खारकर अळी, खारटन रोड, महागिरी, तलावपाळी, ढोकाळी, मानपाडा, खेवरा सर्कल, बाळकुम, मनोरमा नगर, ब्रम्हांड, गांधी नगर, धर्मवीर नगर, वसंत विहार, वृंदावन, राबोडी १, राबोडी २ हे परिसर येतात. या भागात ब्राम्हण समाजाची लोकसंख्या उल्लेखनीय आहे. या मतदारसंघात श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय असा मतदार संघ आहे. तर राबोडी सारख्या विभागात मुस्लिम मतदारही आहेत. राबोडी वगळता सर्वच ठिकाणी भाजपची आघाडी घेतल्याचे निकालातील आकडेवारीतून दिसून आले.

Story img Loader