नागपूर: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, महायुतीकडून निवडणूक लढणारे हौसे, नवसे, गौवसे, मंत्र्यांच्या मागे धावणारे त्यांचे स्वीय सहायक, सर्वच निवडून आले. अन् हा सर्व चमत्कार ‘लाडकी बहीण ’ योजनेमुळे झाला, असे दावेही केले जाऊ लागले. ‘एक है तो सेफ’ है या नाऱ्याचा परिणाम आहे, असा दावा भाजपच्या बड्या नेत्यांनी केला. पण अशा परिस्थितीतही स्वबळावर लाडकी बहीण योजनेचा प्रभाव रोखून, निवडणूक जिंकणाऱ्यांचे प्रमाणही विदर्भात आहे. नागपूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार यापैकीच एक.

२८८ पैकी तब्बल २३४ जागा जिंकणाऱ्या महायुतीने या यशाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला दिले. ही योजना सरकारी होती, कोण्या एका पक्षाची नव्हती, त्याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ती लागू करण्यात आल्याने योजनेसाठी आलेल्या सरसकट अर्जांना मान्यता देण्यात आली, त्याचा लाभ दिवाळीपूर्वी व्हावा याची काळजी घेण्यात आली. अपेक्षेप्रमाणे त्याचा फायदाही सत्ताधाऱ्यांना झाला.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
What is dispute over historic Durgadi Fort and what did court say while handing over fort to government
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे? त्यावर मुस्लिमांचा दावा कसा? किल्ला सरकारच्या ताब्यात देताना न्यायालयाने काय म्हटले?
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व, ‘अकोला पश्चिम’मध्ये बंडखोरीचा भाजपला मोठा फटका; दोन दशकानंतर जिल्ह्यात पंजाला संधी

तर योजना बंद पडेल…हा प्रचार चालला

या योजनेतून मिळणारी मदत महायुतीची सत्ता गेल्यास बंद पडेल, असा प्रचार युतीच्या नेत्यांनी विशेषत: भाजपच्या नेत्यांनी केला. ज्या ठिकाणी तो प्रभावी ठरला, त्या ठिकाणी महिलांनी एकतर्फी मतदान महायुतीला केले. ज्या ठिकाणी हा प्रचार खोडून काढण्यात विरोधकांना यश आले. ही योजना भाजप किंवा महायुतीची नाही तर सरकारी आहे आणि सरकार बदलले तरी ती कायम राहणार हे पटवून दिल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांनी महाविकास आघाडीलाही मतदान केले. त्यामुळेच महायुतीच्या लाटेतही काँग्रेस, उद्धव ठाकरे यांचे काही उमेदवार विजयी झाले. अनेक ठिकाणी ते पराभूतही झाले पण त्यांना मिळालेली मते लक्षणीय स्वरुपाची आहे.

पश्चिम नागपूरमध्ये विकास ठाकरे

पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना मतदारसंघ. येथून फडणवीस दोन वेळा विजयी झाले. त्यानंतरही दोन वेळा ही जागा भाजपकडेच होती. पण २०१९ ला काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी भाजपच्या गडाला सुरूंग लावत तो खेचून आणला. यावेळी ते दुसऱ्यांदा रिंगणात होते. त्यांच्याही मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसारही भाजपने केला. मात्र ठाकरे यांनी ही योजना भाजपची नव्हे तर सरकारी आहे हे पटवून दिल्याने त्यांना त्याचा फटका बसला नाही. भाजपसारख्या सर्वचबाजूंनी बलाढ्य असलेल्या पक्षावर ते सलग दुसऱ्यांदा मात केली.

उत्तरमध्ये नितीन राऊत यांचा करिश्मा

उत्तर नागपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा पराभव करायचाच हा संकल्प करून भाजप या मतदारसंघात रणनिती करत होता. दलित, मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी शक्य होईल ते सर्व करण्यात आले. अनेकांना पैसे देऊन उभे करण्यात आले. काहींना राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी मदत करण्यात आली. यात अनेकांनी ‘खिसे’ गरम करून घेतले. या शिवाय लाडकी बहीण योजनेचाही प्रचार झाला. शहरातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत येथे दलित वस्त्यांमध्ये राहणारा सर्वसामान्य व गरीब नागरिक मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून भाजपची रणनिती यशस्वी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्षात सजग मतदारांनी लाडकी बहीण योजनेचा लाभही घेतला आणि भाजपला धडाही शिकवला. काँग्रेसचे नितीन राऊत यांचा व्यक्तिगत करिश्मा या मतदारसंघात चालला.

हेही वाचा – प्रस्थापितांची शेती पडीत ठेवून मतदारांनी कमळ शेती फुलविली, भाजपच्या पदरात भरभरून मतदान

उमरेड उच्चशिक्षिताला प्राधान्य

उमरेड मतदारसंघातही भाजपला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला नाही. भाजप हा पैशाच्या जोरावर आमदार खरेदी करतो हे या मतदारसंघातील माजी आमदार राजू पारवे यांच्या पक्षबदलाने स्पष्ट झाले होते. काँग्रेसकडून उमरेडमधून निवडून आलेले पारवे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत गेले आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते भाजपमध्ये आले. आपण काहीही केले तरी मतदार निमूटपणे स्वीकारतात हा भाजपचा भ्रम फोडत, हिंदू दलित-दलित हा भेद न करत उमरेडच्या मतदारांनी काँग्रेसचे उच्चशिक्षित उमेदवार संजय मेश्राम यांच्या बाजूने कौल दिला. लाडकी बहीण येथेही भाजपच्या कामी आली नाही.

Story img Loader