अकोला : बाळापूर विधानसभा मतदारसंघातील लढत दोन्ही शिवसेनेसह वंचित आघाडीसाठी आव्हानात्मक ठरत आहे. मतदारसंघातील लढतीला धार्मिक रंग चढले. मतविभाजन देखील निर्णायक ठरण्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट यांच्या दृष्टीने बाळापूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा ठरतो. बाळापूरमधील चुरशीच्या सामन्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बाळापूर मतदारसंघाने विविध पक्षांच्या आमदारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. २०१९ मध्ये युतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांनी १८ हजार ७८८ मतांनी विजय मिळवला होता. त्यात भाजपच्या गठ्ठा मतदानाचा मोठा वाटा होता. शिवसेनेच्या फाटाफुटीच्या राजकारणामध्ये नितीन देशमुख हे केंद्रस्थानी होते. एकनाथ शिंदे यांच्यासाेबत सुरत व गुवाहाटी येथे जाऊन देशमुख उद्धव ठाकरेंकडे परतले. त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या दृष्टीने बाळापूर अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. बाळापूरमध्ये वंचितचे नातीकोद्दिन खतीब, शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख व शिवसेना शिंदे गटाचे बळीराम सिरस्कार यांच्यात तिरंगी लढत आहे.
हेही वाचा – साकोलीत पटोले, करंजेकर व ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत, तेली, कुणबींच्या मतांवर विजय अवलंबून
बाळापूरच्या राजकीय समीकरणात मोठा फेरबदल झाला. माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नातीकोद्दिन खतीब यांचा पक्षप्रवेश घेऊन वंचितने त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. बाळापूरमध्ये मुस्लीम, दलित मतदारांची संख्या मोठी आहे. ते मतदान एकत्रित ठेऊन इतर मते मिळवण्याचे वंचितचे प्रयत्न आहेत. गठ्ठा मतदार सोबत असल्याचे नातीकोद्दित खतीब यांनी गृहीत धरल्याचे दिसून येते. त्याचा त्यांना मोठा फटका वंचितला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभा निवडणुकीत बाळापूरमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली होती. आता बदलेल्या समीकरणामुळे नितीन देशमुख यांची अडचण वाढली. जागा कायम राखण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल. छोट्या-मोठ्या समाजाला एकत्रित आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. उद्धव ठाकरेंची सभा घेऊन त्यांनी वातावरण निर्मिती केली.
बाळापूरच्या जागेसाठी महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच झाल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आला. शिवसेना शिंदे गटाला जागा मिळाली तरी उमेदवार मात्र त्यांना भाजपमधून आयात करावा लागला. भाजपने तशी पूर्वीच अट टाकल्याचे बोलल्या जाते. शिवसेना शिंदे गटावर तडजोडीचे राजकारण करण्याची नामुष्की ओढवली. बाळापूरमधील माळी समाजाचे गठ्ठा मतदान लक्षात घेता भाजपचे पदाधिकारी बळीराम सिरस्कार यांना शिवसेनेने निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यामुळे महायुतीमध्ये प्रचंड नाराजी पसरली. पक्षांतर्गत देखील खदखद वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे प्रचार सभा घेतली. बाळापूरमध्ये तुल्यबळ लढत असून दोन्ही शिवसेनेसह वंचितसाठी मार्ग सोपा राहिलेला नाही.
हेही वाचा – मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
गठ्ठा मतदारांचे वजन कुणाच्या पारड्यात?
बाळापूर मतदारसंघात सर्वधर्मियांसह विविध जातीचे गठ्ठा मतदार आहेत. या मतदारसंघात मराठा, कुणबी समाजाची मतपेढी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील अंतर्गत वादातून राष्ट्रवादीचे कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून ते रिंगणात उतरले. त्यामुळे मराठा समाजाच्या मतांचे काही प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम दोन्ही शिवसेनेच्या मतांवर होणार आहे.