भंडारा : जिल्ह्यात भंडारा, साकोली आणि तुमसर या तीनही विधानसभा मतदारसंघांत यावेळी लढत चुरशीची आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपक्षांचे कडवे आव्हान स्वीकारून विजयाचा झेंडा रोवणे म्हणावे तेवढे सोपे नाही.

साकोली विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी आणि लाखांदूर हे तीन तालुके येतात. २००९ पासून येथे भाजपचा वरचष्मा आहे. मागील काही विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर या मतदारसंघात दर दोन टर्मनंतर मतदार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला संधी देतात. कधी दोन टर्म काँग्रेस तर कधी दोन टर्म भाजप असे आतापर्यंतचे राजकीय समीकरण दिसते.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !

साकोली विधानसभा मतदारसंघ आणि भंडारा जिल्ह्यावर नाना पटोलेंची मजबूत पकड आहे. पटोलेंचे भंडाऱ्यावरील वर्चस्व कमी करण्यात अद्याप भाजपला यश आले नाही. पटोले यांना आव्हान देण्यासाठी या मतदारसंघात भाजपला सुरुवातीला तुळ्यबळ उमेदवार सापडत नव्हता. पटोलेंना शह द्यायचा असेल तर बाहेरचा उमेदवार न आणता स्थानिक उमेदवारच तगडी लढत देऊ शकतो, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना होती. त्यासाठी भाजपकडून माजी आमदार बाळा काशीवार आणि सोमदत्त करंजेकर यांनी या मतदारसंघात तयारीही केली होती. दोघांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीतून (अजित पवार गट) आयात करून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली. अविनाश ब्राह्मणकर हे कुणबी असून ते प्रफुल्ल पटेलांचे कार्यकर्ते आहेत. तसेच ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आहे. त्यांच्यामुळे आता कुणबी मतं विभाजित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन

ऐनवेळी ब्राह्मणकर यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे स्थानिक भाजप नेते नाराज झाले. पक्षात उमेदवार असताना बाहेरून आयात करायची काय गरज होती, अशी नाराजी इथले भाजप कार्यकर्ते बोलून दाखवतात. आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळे भाजपचे नेते सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी केली. भाजपचे माजी आमदार बाळा काशीवार हे उघडपणे भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा प्रचार करताना दिसतात. तसेच सोमदत्त करंजेकर यांचे वडील ब्रह्मानंद करंजेकर आरएसएससोबत संबंधित आहे. करंजेकरांचा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जनसंपर्क आहे. दुसरीकडे ब्राह्मणकर हे जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचे फारसे वलय दिसत नाही. ते प्रफुल्ल पटेलांचे कार्यकर्ते आहे. आता बंडखोर अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजेकर हे कुणाचे गणित बिघडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण करंजेकर हे तेली समाजाचे आहेत. या मतदारसंघात तेली मतांचा ओढा हा भाजपकडे असतो. पण, या मतदारसंघातली तेली मते यावेळी भाजपचे अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजेकर यांच्यामुळे विभाजित होण्याची भीती आहे. त्याचा फटका हा भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो असे राजकीय जाणकार सांगतात.

हेही वाचा – मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा

साकोली विधानसभा क्षेत्रात विकास, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत. पण, आतापर्यंत या मुद्यांचा निवडणूक निकालावर थेट परिणाम झाल्याचे दिसले नाही. इथल्या निकालावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते इथले जातीय समीकरण. येथे सर्वाधिक मतदार कुणबी आहेत. त्यानंतर तेली व दलित समाजाची मते या मतदारसंघात आहे. यामुळे पटोले या मतदारसंघातून निवडून येतात. लोकसभेलाही या मतांचा फायदा होत पडोळे खासदार झाले. या मतदारसंघात नाना पटोले, सोमदत्त करंजेकर आणि अविनाश ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. आता या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार हे बघणे महत्त्वाचे आहे.