पाऊल ‘शतप्रतिशत’कडे…

यंदा ‘मुख्यमंत्रीपद भाजपकडेच हवे’ यासाठी रा. स्व. संघाचे पाठबळ मिळाल्याने महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला आहे.

amit shah 100 percent bjp in maharashtra
पाऊल ‘शतप्रतिशत’कडे… (Photo Credit – X/Devendra Fadnavis)

आगामी २०२९च्या निवडणुकीत महाराष्ट्रात ‘शत-प्रतिशत भाजप’च्या दिशेने वाटचाल राहील, असे सूतोवाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होेते. त्याची सुरुवात या विधानसभा निवडणुकीपासूनच झाल्याचे निकालाची आकडेवारी दर्शविते.

यंदा ‘मुख्यमंत्रीपद भाजपकडेच हवे’ यासाठी रा. स्व. संघाचे पाठबळ मिळाल्याने महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज यांसह अनेक विकास योजना व घोषणांना आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसह अन्य निर्णयांमुळे जनतेने महायुतीला भरभरून मतदान केले. ‘एक है तो सेफ है ’ आणि ‘ बटेंगे तो कटेंगे’ यासारख्या भावनिक आवाहनांमुळे धार्मिक ध्रुवीकरणाचे उद्दिष्ट साध्य होऊन त्याचाही लाभ झाला.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
belapur assembly constituency sandeep naik vs manda mhatre maharashtra vidhan sabha election
लक्षवेधी लढत: भाजपच्या आमदार पुत्राचेच पक्षाला आव्हान
Phulumbri Assembly Constituency Assembly Election 2024 Challenge to BJP in Haribhau Bagde constituency
हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर झालेली ही निवडणूक अतिशय अटीतटीची होती. ‘उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये दगाबाजी केल्याने आम्ही वचपा काढला,’ असे फडणवीस यांनी पक्षफोडीनंतर जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षफुटींचे खापर मोदी-शहांबरोबरच फडणवीस यांच्यावर प्रामुख्याने फोडण्यात आले होते. मराठा (कुणबी) समाजाला १० टक्के आरक्षण देऊनही मनोज जरांगे व अन्य नेत्यांनी फडणवीस यांना खलनायक ठरविले होते. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत राज्यात काम करण्याचे आव्हान फडणवीस यांच्यापुढे होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी असले, तरी राज्याचा गाडा हाकण्याचे व महत्त्वाचे निर्णय व योजना मार्गी लावण्याचे काम फडणवीस यांनी केले.

हेही वाचा : काँग्रेसवर लाल शेरा!

अडीच वर्षांच्या कार्यकाळात विकासाचे शेकडो निर्णय सरकारने घेतले. मेट्रो, अटल सेतू, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग यांसह अनेक विकास प्रकल्प पूर्णत्वास नेले. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यावरही, नैराश्यातून बाहेर पडून लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, सर्वसामान्यांना वीजबिलात ३० टक्के सवलत यांसारख्या अनेक लोकप्रिय योजनांची अस्त्रे निवडणुकीआधी महायुतीने बाहेर काढली. त्यांची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याची कल्पकता दाखविली गेली. ‘महायुतीला विजय मिळाला, तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील,’ असे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व अन्य नेत्यांनी दिले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांचे जाहीर कौतुकही केले होते. फडणवीस यांचे नेतृत्व पुढे करण्याचा राजकीय लाभ भाजपला झाला.

महाराष्ट्रात भाजपला एकट्याच्या बळावर कधीही विधानसभेतील बहुमताचा १४५ चा आकडा साध्य करता आलेला नाही.

भाजपने २०१४ पूर्वी कधी शंभरीही गाठली नव्हती. पण भाजपला २०१४ मध्ये १२२ आणि २०१९ मध्ये १०५ जागांवर विजय मिळाला, तर हा आकडा २०२४ च्या निवडणुकीत १३३ पर्यंत पोहोचला. २०२९च्या शत-प्रतिशतची झलक दाखविण्यास भाजपने आतापासूनच सुरुवात केली आहे.

●लोकसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या मर्जीने उमेदवार ठरविले गेले, सर्वेक्षणाचे दाखले देत अनेक खासदारांना उमेदवारी नाकारली गेली.

●अनेक कारणांमुळे भाजपला निवडणुकीत मोठा फटका बसला. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनाम्याची तयारी दाखविलेल्या फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवीत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडेच विधानसभेसाठी निर्णयाचे सर्वाधिकार दिले.

हेही वाचा : पवार जिंकले… पवार हरले !

●लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची (एकनाथ शिंदे) काही टक्के मते भाजप उमेदवाराला मिळाली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ची मते परावर्तित होऊ शकली नव्हती.

●फडणवीस यांनी या निवडणुकीत ही मते भाजपकडेही कशी येतील, याची रणनीती आखली. त्याचबरोबर रा. स्व. संघाचे कार्यकर्ते संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरावेत, यासाठी फडणवीस यांनी संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी वेळोवेळी चर्चा केली.

●महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नसला, तरी फडणवीस हेच प्रमुख दावेदार असतील, हाच संदेश संघ कार्यकर्त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत फारसे सक्रिय नसलेले संघ/भाजप कार्यकर्ते फडणवीस यांच्यासाठी या निवडणुकीत जोमाने मैदानात उतरले. त्यामुळे राज्यभरात मतदानाचा टक्का वाढला आणि महायुतीला दणदणीत विजय साध्य करता आला.

हेही वाचा : मुंबई : ठाकरेंची मक्तेदारी मोडीत, मुंबईवर भाजपची सरशी

●पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा, फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी ज्येष्ठ नेत्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाचे आवाहन केले, त्याचा लाभ महायुतीला होऊन मतदानाची टक्केवारीही वाढली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha result amit shah 100 percent bjp in maharashtra rss devendra fadnavis chief minister print politics news css

First published on: 24-11-2024 at 04:16 IST

संबंधित बातम्या