लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात पडझड होत असताना महायुतीमागे उभ्या राहणाऱ्या कोकण पट्टीने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश तिच्या पारड्यात टाकले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमधील ३९ जागांपैकी ३५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. लोकसभेत फटका बसल्यानंतरही कोकण पट्ट्यावर दावा सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंना या निकालांनी धक्का दिला. कोकणातील ३९ पैकी २४ जागा लढवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कामगिरीवर महाविकास आघाडीची भिस्त होती. मात्र, गुहागरचा अपवाद वगळता एकाही जागेवर ठाकरेंना यश मिळाले नाही. कर्जतची चुकलेली उमेदवार निवड, रायगड जिल्ह्यात शेकापशी दुरावा ठाकरे गटासाठी नुकसानदायक ठरले.

मुंबईसह ठाणे, कोकण पट्टा हा एके काळी एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे. एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतरही कोकणातील राजन साळवी, भास्कर जाधव आणि वैभव नाईक हे तीन आमदार आणि अनंत गिते, राजन विचारे हे दोन खासदार ठाकरे यांच्यासह राहिले. कोकण, ठाण्यात ठाकरेंना मानणारा मतदार मोठ्या संख्येने असल्याने या भागात मुख्यमंत्री आणि भाजपचा टिकाव लागेल का, अशी चर्चा सुरुवातीला होती. लोकसभा निवडणुकीत या शक्यतांना विराम देत महायुतीने सहापैकी पाच जागांवर दणदणीत विजय मिळवला. कोकण, ठाण्यावरील ठाकरेंचा प्रभाव ओसरत चालल्याचे हे निदर्शक मानले जात होते. उद्धव यांच्या भाषणातूनही ही सल दिसली. तरीही विधानसभा निवडणुकीत या पट्ट्यातील मतदार आपल्यावर विश्वास दाखवतील असा त्यांचा दावा होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात या पट्ट्यातील ३९ पैकी सर्वाधिक २४ जागा ठाकरे यांच्यासाठी सोडण्यात आल्या. मात्र ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचे प्रभावक्षेत्र असल्याने या भागात ठाकरे कितपत टिकाव धरतील याविषयी शंका उपस्थित केली जात होती. या संपूर्ण भागात १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवत मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने कोकण व ठाण्यावरील आपल्या पक्षाचा प्रभाव अधोरेखित केला. ठाणे जिल्ह्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर बरेच मतभेद होते. भाजपच्या काही जागांवर शिंदे सेनेच्या उमेदवारांनी बंडखोरीही केली होती. त्याचाही फायदा महाविकास आघाडीला उठवता आला नाही. भाजपनेही या संपूर्ण पट्ट्यातील १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवला. कुडाळ, पालघर, बोईसर, भिवंडी पूर्व या जागांवर भाजपने आपल्या पक्षाचे इच्छुक शिंदे सेनेतून रिंगणात उतरविले. ही आखणी महायुतीच्या पथ्यावर पडल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या पक्षाने या भागात चार जागा लढविल्या होत्या. त्यापैकी कळवा-मुंब्र्याचा अपवाद वगळला तर तीन जागांवर त्यांच्या पक्षालाही विजय मिळाला.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप

हेही वाचा : ‘कमळ’ भेदिते ‘आरक्षण’मंडळा!

या पट्ट्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने २४ जागा लढविल्या होत्या. त्यामुळे मविआची भिस्त या भागात त्यांच्यावरच होती. ठाणे जिल्ह्यात आपण मुख्यमंत्र्यांच्या संघटनेला आव्हान उभे करू शकू, असा विश्वास ठाकरेंना होता. पक्षफूट आणि त्यानंतरही या भागातील संघटनेला उभारी देण्यासाठी ठाकरे पिता-पुत्रांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतके दौरे सोडले तर फार काही केल्याचे दिसत नव्हते. दुसरीकडे शिंदे पिता-पुत्रांनी आपल्यासोबत राहिलेल्या आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनाही सर्व प्रकारचे बळ दिले होते. कोकण, ठाणे आपणच जिंकू या भ्रमात राहिलेल्या ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या जागावाटपात या पट्ट्यातील ७० टक्के जागांवर दावा केला. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाशी हातमिळवणी करणे सोपे होते. कर्जतसारख्या जागेवर सुधाकर घारे निवडून येतील असे त्यांना सांगितले जात होते. मात्र अलिबागचा अपवाद वगळता शेकापसोबत बोलणेही ठाकरे सेनेने टाळले. निष्ठावंत या एका निकषाच्या आधारे कर्जतमध्ये तुलनेने कमकुवत उमेदवाराची निवड करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात भाजपमध्ये मोठी अस्वस्थता होती. ही अस्वस्थता हेरून काही तुल्यबळ उमेदवार गळाला लावणे ठाकरेंना शक्य होते. मात्र त्यासाठी पक्षबांधणी आणि निवडणूकपूर्व मेहनतीसाठी दौऱ्यांची जी आवश्यकता होती ते केलेच नाहीत. यामुळे २४ पैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता ठाकरे यांच्या पक्षाला महायुतीपुढे आव्हानही उभे करता आले नाही हे स्पष्ट झाले आहे.

jayesh.samant@expressindia.com

Story img Loader