Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला. तसेच या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला अपयश आलं. त्यानंतर आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल. त्यासाठी सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली देखील सुरु आहेत. यातच राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आता पुढच्या दोन दिवसांत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचं मुख्यमंत्री नेमकी कोण होणार? हे लवकरच स्पष्ट होईल.

असं असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच या निवडणुकीत महायुतीने जवळपास ८० टक्के जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीच्या आधी महायुतीमध्ये आलेल्या काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, याममध्ये काही नेत्यांच्या ईडी आणि सीबीआय चौकशी देखील सुरु होत्या. मात्र, या नेत्यांनी महायुतीला साथ दिली आणि विधानसभेची निवडणूक लढवली. यामध्ये नेमकी कोणत्या नेत्यांचा समावेश आहे? आणि यापैकी कोणत्या नेत्यांचा पराभव झाला आणि कोणत्या नेत्यांचा विजय झाला? याविषयी जाणून घेऊयात.यामध्ये अशा नेत्यांचा समावेश होता की, ते काही वर्ष काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एसपी) आणि शिवसेना (यूबीटी) यांच्या महाविकास आघाडीकडून सत्ताधारी महायुती बरोबर गेले. यामध्ये एकूण १४ उमेदवार आणि त्यांचे काही नातेवाईकांचा समावेश आहे. यातील ८ जणांचा विजय झाला तर बाकीचे पराभूत झाले.

rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Narendra Modi and Rahul Gandhi Chimur, Chimur,
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या चिमुरातील सभेची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा
Kiren Rijiju criticized pm modi said PM Modi targets Congress
मोदींनी संसदेला ओलीस ठेवले होते…काँग्रेस प्रवक्त्याच्या आरोपाने…
Gajendra Shekhawat criticized Mahavikas Aghadi government for increased corruption and halted projects
मविआ सरकारमुळे राज्याला आजही दुष्परिणाम भोगावे लागताहेत, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टिका
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?

हेही वाचा : भुजबळ यांना मराठा समाजाच्या नाराजीची बसली झळ

विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या काही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांचा समावेश आहे. २०२२ मध्ये शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बहुतेक आमदार त्यांच्याबरोबर गेले आणि आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सामील झाले. या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीच सरकार सत्तेत आलं. त्यानंतर एका वर्षात राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार काही आमदारांसह सत्ताधारी महायुतीत सहभागी झाले. मात्र, तेव्हा पक्षांतर करणाऱ्यांमध्ये काही आमदार सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) किंवा आयकर विभागासारख्या एजन्सींच्या चौकशीला सामोरे जात होते तर काहींवर भ्रष्ट्राचाराचे आरोप होते.

यामध्ये छगन भुजबळ हे जवळपास दोन वर्षे तुरुंगात होते. त्यांच्यावर महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणात भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले होते. पुढे त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते अजित पवारांबरोबर महायुतीत दाखल झाले आणि आता या निवडणुकीत ते येवला मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसेच याच प्रकरणात ईडीच्या चौकशीला सामोरे जाणारे समीर भुजबळ यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत समीर भुजबळ यांचा पराभव झाला.

या बरोबरच माजी राज्यमंत्री नवाब मलिक हे देखील ईडी आणि सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मात्र, त्यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन दिल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले. यानंतर नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला साथ दिली. त्यानंतर त्यांनी मानखुर्द-शिवाजी नगरमधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तसेच त्यांनी त्यांच्या परंपरागत मतदारसंघात अणुशक्ती नगरमधून त्यांची मुलगी सना मलिक यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. यामध्ये सना मलिक यांचा विजय झाला.

हेही वाचा : Mahayuti: विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोडले सर्व विक्रम; १३८ उमेदवारांनी मिळवली ५० टक्क्यांहून अधिक मते

या बरोबरच राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा झीशान सिद्दीकी यांना होईल असं बोललं जात होतं. तसेच झीशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून वांद्रे पूर्वमध्ये विधानसभा लढवली. पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादात प्रवेश केला होता. त्याआधी त्यांची ईडीने कथित एसआरए घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

ऑगस्ट २०२१ मध्ये ईडीने भावना गवळी यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप केले होते. या प्रकरणात त्यांच्या संबंधित संस्थांत ईडीने कारवाई केली होती. मात्र, जून २०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा गवळी यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भूमिका घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर भावना गवळी यांना विधान परिषदेचे सदस्यत्व शिवसेनेकडून (शिंदे) देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेची रिसोडमधून निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला.

तसेच शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांची ईडीसह अनेक यंत्रणांकडून चौकशी सुरु होती. मात्र, जून २०२२ मध्ये यामिनी जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी भायखळ्यातून शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. तसेच महाराष्ट्र सहकार प्रकरणी ईडीच्या चौकशीत असलेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे देखील शिंदे या गटात सामील झाले. त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी दर्यापूरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

तसेच शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि अर्जुन खोतकर यांच्यावरही मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप झाले होते. या निवडणुकीत ओवळा-माजिवड्यात प्रताप सरनाईक यांचा दणदणीत विजय झाला तर जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांनी विजय मिळवला. तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे दिलीप वळसे पाटील हे देखील आंबेगावमधून आणि हसन मुश्रीफ हे कागलमधून विजयी झाले आहेत. दरम्यान, वरील सर्व नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी आणि कारवाई सुरु होती. मात्र, यातील काही नेत्यांनी महायुतीला साथ देत निवडणुकीत काहींचा विजय तर काहींचा पराभव झाला आहे.