ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा – कळवा या बालेकिल्ल्याला आता शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून सुरुंग लावण्यासाठी शिवसेना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदेनी आव्हाडांच्या विरोधात उभे असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्या प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे.

खारीगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यात खासदार डॉ.शिंदे यांनी सर्वांना जोमाने काम करून नजीब यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना या विधानसभा मतदारसंघातून ७० हजारांच्या घरात मतदान झाले होते तर शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना तब्बल १ लाख ३५ हजार ४९६ इतकी मते मिळाली होती. यामुळे या मतांची देखील जुळवाजुळव करणे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढे आव्हान असणार आहे.

eknath shinde bjp
शिवसेना शिंदे गटाकडून तडजोडीची भूमिका; बाळापूरमध्ये भाजपतून आयात उमेदवार
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
In Thane CM Eknath Shinde stated Mahayutis strong performance will stem from work and development
महायुती विरोधकांना चारिमुंड्या चीत करेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Chief Minister Eknath Shinde Jitendra Awad Avinash Jadhav will fill the application form Assembly Elections 2024
ठाण्यात उद्यापासून प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव अर्ज भरणार
Rebellion to Mahayuti and Mahavikas Aghadi in Purandar
पुरंदरमध्ये महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण
mns candidates against mahayuti in thane and kalyan
महायुतीच्या उमेदवारांविरोधात मनसेचे उमेदवार जाहीर; ठाण्यात अविनाश जाधव, तर कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांना उमेदवारी
parbhani loksatta
परभणीत ‘खान हवा की बाण’चे संदर्भ बदलले !

मुंब्रा – कळवा मतदारसंघातील मतदारांची संख्या एकूण ४ लाख ८२ हजार १५४ इतकी आहे. तर लोकसभा निवडणुकीवेळी या विधानसभा मतदारसंघातून २ लाख १५ हजार ४८४ इतके मतदान झाले होते. यामध्ये खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना सुमारे ७० हजार इतकी मते पडली होती तर तर शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना तब्बल १ लाख ३५ हजार ४९६ इतकी मते मिळाली होती. यामध्ये जितेंद्र आव्हाडांचा अधिक प्रभाव असलेल्या मुस्लिम बहुल मुंब्रा शहरातून सर्वाधिक मते वैशाली दरेकर यांना मिळाली होती. यामुळे नजीब मुल्ला यांना मुस्लीम समाजातील मतदारांना देखील आपल्या बाजूने वळवून मतदान पदरात पाडून घ्यावे लागणार आहे.

हेही वाचा >>> सिंदखेड राजात सत्ताधारी पक्षांत मैत्रीपूर्ण लढत?; बंडखोर, अपक्षांमुळे मतविभाजनाचा धोका

कळव्यातील आगरी समाजाची मते महत्वाची

कळवा शहरात आगरी समाजाची मोठे मतदान आहे. येथील मतदान देखील उमेदवाराच्या विजयात मोलाची भूमिका बजावतात. यामुळे राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांना कळव्यातील आगरी समाजाची मते मिळवून देण्याचे एक मोठे आव्हान खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे यात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह नजीब मुल्ला यांना किती यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. क‌ळव्यात मुल्ला हे नाव मतदारांना कितपतच पचनी पडेल यााबाबत साशंकता व्यक्त केली जाते. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आणि मुंब्रा – कळव्याचे प्रस्थापित आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार डॉ.शिंदे यांच्या संबंधांना कायमचा वादाची किनार असल्याचे सर्वश्रुत आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : गोंदिया जिल्ह्यात ‘बंडोबां’मुळे महाविकास आघाडीचे समीकरण बिघडणार?

निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाड यांनी खासदार डॉ. शिंदे यांना केलेली टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली होती. तर खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेली वादावादी या दोघांच्या वादाची शिखर ठरली होती. तर यावेळी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्ती करून वाद मिटवावा लागला होता. यामूळे डॉ. श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामधून विस्तवही जात नाही हे सर्वश्रुत आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून मुंब्रा – कळवा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी मंगळवारी खारेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुढील एक महिना अधिक जोमाने काम करा. महायुती सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा योग्य प्रचार – प्रसार करून आपले उमेदवार नजीब मुल्ला यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे आहे, असे आवाहन यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी सर्वांना केले. तर नजीब मुल्ला यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विजयाची भेट देऊ असे मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. यामुळे यंदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनाही सोपी नसल्याचे दिसून येत आहे.