वर्धा, :  जिल्ह्यातील चार पैकी वर्धा, हिंगणघाट व आर्वी येथे बंडखोऱी दिसून आली आहे.  अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यावर दिवस उलटला. पण या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी काहीच ‘ निरोप ‘ आला नसल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र आर्वीत बंडखोरी थांबविण्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरूच आहे. विद्यमान आमदार दादाराव केचे यांचा पत्ता कट करीत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांना तिकीट देण्यात आल्याने वावटळ  उठले. केचे संतप्त आहेत. अर्ज दाखल करण्याचा ईशारा त्यांनी दिला आणि पक्षनेते हादरून  गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांची समजूत काढण्यासाठी माजी खासदार रामदास तडस हे केचे यांना घेऊन नागपुरात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे पोहचले. तिथे अन्य काही प्रमुख नेत्यांनी केचे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे नजीब मुल्लांसमोर आव्हान

bjp candidate mahesh landge in trouble due to former mla vilas lande stand against mahayuti
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीतून महायुतीविरोधात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
vidhan sabha election 2024 osmanabad assembly constituency rebel in mp omraje nimbalkar house
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरातूनच बंडखोरी?
uddhav thackeray sharad pawar (3)
Maharashtra Assembly Election : “शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी…”, शिवसैनिकांचा गंभीर आरोप; म्हणाले, “मविआचा प्रचार करणार नाही”
uddhav thackeray announced candidates on 12 seats claimed by congress sharad pawar ncp and allied shekap
Maharashtra Assembly Elections 2024 : १२ जागी ठाकरेंची अडेल भूमिका; महाविकास आघाडीत बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Big Fights in Marathi
Mahayuti vs Mahavikas Aghadi : विधानसभेचा रणसंग्राम! ‘या’ मतदारसंघात तिरंगी लढत, कोण आहेत हे दिग्गज?
president of the Bahujan Vikas Aghadi Hitendra Thakur to contest assembly election from vasai constituency
Maharashtra Assembly Election 2024 : हितेंद्र ठाकूर वसईतून लढणार; कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर केली घोषणा
Challenge of Rebellion for Mahayuti in Amravati
अमरावती जिल्‍ह्यात महायुतीसमोर बंडखोरीचे आव्‍हान

डिसेंबर मध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत पहिल्या क्रमांकाची उमेदवारी देण्याची ठोस  हमी देण्यात आली. तसेच ही हमी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्यसमोर वदवून  घेऊ, असे पण सांगण्यात आले. दादाराव तेथून परत आले आणि माझ्या या हमीवर विश्वास नाही असे स्पष्ट करीत अर्ज दाखल करून बसले. त्यांनी अर्ज दाखल केल्यावर त्यांनी तो परत घ्यावा व सुमित वानखेडे यांच्या विजयासाठी प्रयत्न करावे, यासाठी पक्षीय पातळीवार प्रयत्न आजही सूरू असल्याचे दिसून आले. मात्र ब्रहदेव आला तरी अर्ज मागे घेणार नाही,  निवडणूक लढणारच, असा जाहिर पवित्रा केचे यांनी घेतला आहे. वर्धा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समीर सुरेश देशमुख यांनी अर्ज सादर करीत खळबळ उडवून दिली.

हेही वाचा >>> सिंदखेड राजात सत्ताधारी पक्षांत मैत्रीपूर्ण लढत?; बंडखोर, अपक्षांमुळे मतविभाजनाचा धोका

जिल्ह्यात पक्षाचे स्थान कायम राहण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ही जागा मित्रपक्षास  सोडू नये, असा पक्षाचा आग्रह होता. मात्र त्यावर निर्णय नं घेता सतत पराभूत होणाऱ्या काँग्रेसला जागा बहाल केल्या गेली. आता लढणारच असे सांगणाऱ्या समीर देशमुख यांनी अद्याप अर्ज मागे घ्यावा असा एकही  निरोप नाही आल्याचे नमूद केले. त्याची लढत काँग्रेसचे  शेखर शेंडे यांच्याशी होणार. हिंगणघाट येथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बलाढ्य सहकार नेते सुधीर कोठारी यांनी अर्ज सादर केला आहे. पक्षनिष्ठ राहून कार्य केले. पडत्या काळात सोबत राहलो. मतदारसंघात ताकद काय, हे पण दाखवून दिले. पण नवख्यांना उमेदवारी देत पक्षाने अन्याय केल्याची त्यांची भावना आहे. अर्ज मागे घ्या, असे अद्याप कुणीही म्हटले नाही. मात्र थेट पक्षनेते शरद पवार यांचा फोन आला की देशमुख व कोठारी हे बंडाचे निशाण खाली घेतील, असे म्हटल्या जात आहे.