पिंपरी : महाविकास आघाडीचा पिंपरी मतदारसंघातील तिढा सुटला असून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे हा मतदारसंघ राहिला आहे. या पक्षाने माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने आमदार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे पिंपरीत घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना होणार आहे. महाविकास आघाडीचा चिंचवड, भोसरीचा तिढा अद्यापही कायम असून भोसरीवरून रस्सीखेच सुरू आहे.

महायुतीने शहरातील उमेदवार जाहीर करून आठ दिवस झाले. परंतु, महाविकास आघाडीतील गोंधळ कायम आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही महाविकास आघाडीत चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे. पिंपरीच्या जागेसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सुटला आहे. या पक्षाने माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत शीलवंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्यांच्याऐवजी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली होती. नाराज झालेल्या शिलवंत यांनी बंडखोरी न करता पक्षाचे काम करण्याची भूमिका घेतली. पक्षातील फुटीनंतर सर्व माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले असताना शीलवंत यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. निष्ठेचे फळ मिळाल्याची प्रतिक्रिया शिलवंत यांनी दिली.

ncp ajit pawar announce mauli katke name as a Candidate from shirur constituency
‘शिरूर’ची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे; माऊली कटके यांची उमेदवारी जाहीर
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते…
NCP announced candidate from Sharad Pawar group in Murtijapur constituency there is split in party
राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटन सचिवाची सोडचिठ्ठी…सम्राट डोंगरदिवेंसमोर डोंगराएवढे…
Samrat Dongardive is candidate from Sharad Pawars NCP faction in Murtajapur Constituency
मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रवादीकडून सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी, पक्षात नव्याने आलेल्यांना संधी
Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
NCP Ajit Pawar candidate for existing MLAs in Pune district Pune news
वर्चस्वासाठी विद्यमानच वरचढ; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पुणे जिल्ह्यात सावध पवित्रा
will be Friendly fight between BJP and NCP in Vadgaonsheri
वडगावशेरीत भाजप-राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत?
aspirants in maha vikas aghadi for three constituencies in pimpri chinchwad
पिंपरी : महाविकास आघाडीतील इच्छुकांची मुंबईत धाव; एकही उमेदवार जाहीर न झाल्याने धाकधूक

हेही वाचा : सांगली जिल्ह्यात आघाडीतील गोंधळ संपता संपेना; मिरज, खानापूरमध्ये जागेवरून तर सांगलीत उमेदवारीवरून वाद

चिंचवडमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून लढण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आग्रही आहेत. तर, निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. कलाटे यांना निवडणुकीचा अनुभव असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे सांगितले जाते. परंतु, कोणत्या पक्षाचे चिन्ह घ्यायचे यावरून उमेदवारीबाबत निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : चैनसुख संचेती सातव्यांदा ‘मलकापूर ‘ रणसंग्रामात! मागील लढतीतील प्रतिस्पर्धीच रिंगणात, दुरंगी लढत अटळ

शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात भोसरीच्या जागेवरून रस्सीखेच दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले अजित गव्हाणे, भाजपमधून शिवसेनेत (ठाकरे) आलेले रवी लांडगे हे इच्छुक आहेत. दोन्ही पक्ष जागा सोडण्यास तयार नाहीत. गव्हाणे यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह समर्थक माजी नगरसेवकांना घेऊन जात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रचाराची एक फेरी पूर्ण झाल्याचे त्यांनी पक्षाला सांगितले आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षही भोसरीच्या जागेसाठी आग्रही आहे. तिन्हीपैंकी शहरातील एक मतदारसंघ मिळावा अशी शिवसेना (ठाकरे) पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे अजित गव्हाणे किंवा रवी लांडगे या दोघांपैकी एकाला थांबावे लागणार हे स्पष्ट दिसत आहे. भोसरीवरून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने माघार न घेतल्यास चिंचवड मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाला सुटू शकतो असे सूत्रांनी सांगितले.