मोहन अटाळकर

अमरावती : तब्‍बल दोन दशके शिवसेनेच्‍या ताब्‍यात असलेला अमरावती लोकसभा मतदार संघ काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर नवनीत राणा यांनी खेचून घेतला, पण आता महाविकास आघाडीने त्‍यांच्‍या विरोधात सक्षम उमेदवार देण्‍यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jayant Patil criticizes Mahayuti, corruption, Jayant Patil,
पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?

नवनीत राणा खासदार म्‍हणून निवडून आल्‍यानंतर त्‍यांनी लगेच भाजपला पाठिंबा दिला. तो काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीसाठी मोठा धक्‍का होता. आता काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीने शिवसेनेच्‍या ठाकरे गटाला सोबत घेऊन व्‍यूहरचना आखणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्रित लढविल्‍यास अमरावतीत नवनीत राणा यांच्‍या विरोधात चांगली लढत देता येईल, असा सूर नुकत्‍याच झालेल्‍या बैठकांमधून उमटला आहे.

हेही वाचा >>> पुणे लोकसभेची पोटनिवडणूक कधी होणार?

नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला आणि त्‍यांचे पती आमदार रवी राणा हे राज्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या समर्थनार्थ उभे ठाकले. भाजपच्‍या सहयोगी खासदार म्‍हणून वावरताना नवनीत राणा यांनी राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्‍थापन होताच थेट तत्‍कालीन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्‍य केले. वर्षभरापुर्वी उद्धव ठाकरे यांच्‍या मातोश्री या निवासस्‍थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट धरून राणा दाम्‍पत्‍याने राष्‍ट्रीय माध्‍यमांमध्‍ये प्रसिद्धी मिळवली, पण त्‍यामुळे ठाकरे समर्थक शिवसैनिक चांगलेच खवळले.

हेही वाचा >>> सांगलीत साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे गटातच लढत

उद्धव ठाकरे यांच्‍यावर टीका करण्‍याची एकही संधी राणा दाम्‍पत्‍याने गमावलेली नाही. त्‍यामुळे ठाकरे गट राणा दाम्‍पत्‍याच्‍या विरोधात आक्रमकपणे समोर आला आहे. नवनीत राणा यांची कोंडी करण्‍याचा प्रयत्‍न ठाकरे गटाने सुरू केला आहे. ठाकरे गटाच्‍या उपनेत्‍या सुषमा अंधारे यांनी राणा दाम्‍पत्‍याच्‍या बालेकिल्‍ल्‍यात येऊन राणांच्‍या विरोधात घणाघाती टीका केल्‍यानंतर त्‍याची चुणूक दिसली. पण, ठाकरे गटातील स्‍थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी हा रणनीतीच्‍या दृष्‍टीने मोठा अडसर ठरला आहे. ठाकरे यांचे समर्थक असलेले अनेक जुने नेते नाराज आहेत. त्‍यातून ठाकरे गटाला मार्ग काढावा लागणार आहे.

हेही वाचा >>> माधव, खाम, अहिंदा…निवडणुका जिंकण्यासाठी यशस्वी प्रयोग

अमरावती लोकसभा मतदार संघ १९९६ पासून शिवसेनेच्‍या ताब्‍यात होता. अनंत गुढे यांनी १९९८ च्‍या निवडणुकीचा अपवाद वगळता २००९ पर्यंत प्रतिनिधित्‍व केले. हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्‍यानंतर आनंदराव अडसूळ हे दोन वेळा खासदार बनले. नवनीत राणा आणि अडसूळ यांच्‍यात त्‍यावेळी अनेकवेळा संघर्ष उडाला. अडसुळांनी नवनीत राणा यांचे जातपडताळणी प्रमाणपत्राचे प्रकरण उकरून काढले. सध्‍या हे प्रकरण सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ठ आहे. पण, गेल्‍या काही वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अडसूळ यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्‍याचा निर्णय घेतल्‍यानंतर आता शिवसेनेच्‍या ठाकरे गटासमोर अमरावतीतून सक्षम उमेदवार देण्‍याचे आव्‍हान आहे.

काल-परवा ठाकरे गटाच्‍या उपनेत्‍या सुषमा अंधारे यांचे नाव अचानकपणे समोर आले, पण त्‍यांनी स्‍वत: या मतदार संघातून तांत्रिकदृष्‍ट्या निवडणूक लढवू शकत नाही, असे सांगून चर्चेला पुर्णविराम दिला. त्‍याचवेळी महाराष्‍ट्र राज्‍य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी अध्‍यक्ष ज.मो. अभ्‍यंकर आणि माजी नगरसेवक दिनेश बुब या दोघांची नावे संभाव्‍य उमेदवार म्‍हणून चर्चेत आली आहेत. नवनीत राणा यांच्‍या विरोधात ‘निवडून येण्‍याची गुणवत्‍ता’ असलेला उमेदवार ठाकरे गटाला हवा आहे.  दुसरीकडे, हा मतदार संघ काँग्रेससाठी अनुकूल असल्‍याचे सांगून काँग्रेसनेही येथून दावा केला आहे. काँग्रेसचे दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, जिल्‍ह्याचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रवीण मनोहर यांच्‍यासह अनेक जण निवडणूक लढण्‍यास इच्‍छूक असले, तरी काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट उमेदवारीसंदर्भात काय निर्णय घेणार, यावर पुढील दिशा ठरणार आहे.