मुंबई : मुंबईतील सहा जागांवर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) दोन्ही पक्षांनी दावा केल्याने महाविकास आघाडीतील जागावाटपावर सहमती होऊ शकली नाही. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भातील बैठक वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत तीनही पक्षांनी विभागवार आपले अहवाल समोर मांडले. आजची बैठक प्राथमिक आढावा बैठक असल्याचे सांगण्यात आले. मुंबईसंदर्भातील चर्चेनंतर विभागवार आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत, लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला आघाडी मिळाली होती. प्रत्येक मतदारसंघात तीन प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत यावर बैठकीत चर्चा झाली. त्याचप्रमाणे कोणत्या मतदारसंघात कोणात्या पक्षाची ताकद जास्त आहे, तसेच कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हा निकष समोर ठेवून जागा वाटप करण्यावर या बैठकीत चर्चा झाली.

हेही वाचा : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना सरकारी पदे; भाजप, अजित पवार गटाचे नेते दुर्लक्षित

dharavi protestors give preference to toilets
धारावी बचाव आंदोलनकर्त्यांचा वचननामा जाहीर, शौचालयाला प्राधान्य
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!

या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. मुंबईतील हा तिढा लवकर सोडवून ३६ जागांचे वाटप पूर्ण करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेसचे नेते व्यग्र असल्यामुळे मविआच्या बैठकीच्या तारखांवर तारखा पडत आहेत.