मुंबई : मुंबईतील सहा जागांवर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) दोन्ही पक्षांनी दावा केल्याने महाविकास आघाडीतील जागावाटपावर सहमती होऊ शकली नाही. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भातील बैठक वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत तीनही पक्षांनी विभागवार आपले अहवाल समोर मांडले. आजची बैठक प्राथमिक आढावा बैठक असल्याचे सांगण्यात आले. मुंबईसंदर्भातील चर्चेनंतर विभागवार आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत, लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला आघाडी मिळाली होती. प्रत्येक मतदारसंघात तीन प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत यावर बैठकीत चर्चा झाली. त्याचप्रमाणे कोणत्या मतदारसंघात कोणात्या पक्षाची ताकद जास्त आहे, तसेच कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हा निकष समोर ठेवून जागा वाटप करण्यावर या बैठकीत चर्चा झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा