राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: सभा होऊ नये म्हणून भाजपने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करत महाविकास आघाडीने दणक्यात वज्रमुठ सभा घेऊन भाजपच्या नागपूर बालेकिल्ल्याला हादरे दिले. सध्या भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची प्रक्रिया सुरू केली असताना महाराष्ट्रात तीन पक्षाच्या महाविकास आघाडीची वज्रमुठ अधिक घट्ट आहे, असा संदेश या सभेतून गेला.

भाजपने शिवसेनेत फूट पाडून महाविकास आघाडी सरकार पाडले. त्या विरोधात लढा देण्यासाठी व भाजपला पर्याय उभा करण्यासाठी महाविकास आघाडीने विभागनिहाय सभा घेण्याचा निर्णय घेतला. त्यातील दुसरी सभा रविवारी भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नागपूरमध्ये पार पडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांच्या गृहजिल्हात सभा होत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे होते. त्यामुळेच भाजपने या सभेला थेट विरोध न करता आडमार्गाने विरोध सुरू केला. सभेसाठी मोठे मैदान मिळू दिले नाही. जे मैदान निश्चित केले त्या दर्शन कॉलनतील मैदानाला देखील विरोध केला. ते प्रकरण न्यायालयात गेले आणि सभा घेण्याची परवानगी मिळाली.त्यामुळे भाजपला विरोध करता आला नाही.

आणखी वाचा- भाजपला एकहाती सत्ता शक्य नाही; शिंदे गटाचे भाकित

दुसरीकडे सभा यशस्वी करण्याची जबाबदारी असणाऱ्या काँग्रेसच्या एकजुटीवरही प्रश्नचिन्ह होते. परंतु या सर्व शक्यतांवर मात करीत काँग्रेसने केलेल्या नियोजनाला यश आल्याचे सभेला उसळलेल्या गर्दीवरून स्पष्ट झाले. शेकडो नागरिकांना मैदानाबाहेर ताटकळत राहावे लागले. सभेला झालेली गर्दी आगामी निवडणुकीच्या पाश्वभू्मीवर भाजपच्या मनात धडकी भरवणारी ठरली. सभेतील आसन व्यवस्था आणि नेत्यांच्या भाषणातील मुद्यांवर भाजप टीका करीत असल्याने महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या भाषणात मुद्दाचा पुरुच्चार होऊ दिला नाही.. तसेच परस्पर विरोध वक्तव्य करण्याचे टाळले.पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांना इतरांपेक्षा उंच खुर्ची देण्यात आली होती. ती आरोग्याच्या कारणाने होती. मात्र, यावरून आघाडीत बेबनाव असल्याचे चित्र भाजपने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व नेत्यांसाठी समान खुर्च्या ठेवण्यात आल्या. त्यामुळे भाजपला सभेतील त्रूटीवर बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळेच सभा झाल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘केवळ टोमणे सभा’ अशी प्रतिक्रिया द्यावी लागली.

आणखी वाचा- ओबीसी मतांसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चढाओढ

एकूणच रविवारी नागपुरात झालेली महाविकास आघाडीची सभा भाजपला घाम फोडणारी ठरली, काँग्रेसमधील गटबाजी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची मर्यादित प्रभाव लक्षात घेता ही सभा फोल होईल असा अंदाज भाजपने बांधला होता. मात्र तोच फोल ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.