Mahayuti Records In Vidhansabha Election: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने दमदार विजय मिळवत २३५ जागा पटकावल्या आहेत. हा विजय मिळवताना महायुतीने राज्यभरातून ४९.०६ टक्के मते मिळवली आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या ४९ जागा आणि ३५.०३ टक्के मते आली. मतांची टक्केवारी आणि मताधिक्याचे विश्लेषण केल्यानंतर महायुतीने किती मोठा विजय मिळवला हे लक्षात येते. महायुतीने जिंकलेल्या जागांपैकी तब्बल १३८ जागांवर त्यांच्या उमेदवारांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.

राज्यात २०१४ विधानसभा निवडणुकीत अवघ्या ५५ उमेदवारांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवली होती. इतकी मते मिळवण्याची आमदारांनी ही सख्या २०१९ मध्ये १२९ तर यंदा १५४ वर पोहचली आहे. यावेळी महाविकास आघाडीने फक्त १६ जागांवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवली आहेत. महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाने लढवलेल्या १४९ जागांपैकी १३२ जिंकत २६.८ टक्के मते मिळवली. यामध्ये पक्षाच्या ८४ उमेदवारांनी ५० टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवला. भाजपाने ६०% पेक्षा जास्त मतांसह २६ जागा जिंकल्या आणि साताऱ्यात या निवडणुकीत सर्वाधिक ८०.४% मते मिळविली. भाजपाने यंदा त्यांच्या सर्व जागा किमान ३०% मतांसह जिंकल्या आहेत, राजुरा येथे त्यांना सर्वात कमी ३०.५% मते मिळाली आहेत.

suvendu adhikari Mamata Banerjee
‘आता बंगालची पाळी’, दिल्ली विजयानंतर भाजपा नेत्याचे ममता बॅनर्जींना आव्हान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
BJP electoral performance,
काँग्रेसच्या पराभवाची मालिका सुरूच
या पाच कारणांमुळे भाजपाने जिंकली दिल्लीची निवडणूक; आपचा पराभव कशामुळे झाला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : भाजपाच्या यशाचं गुपित काय? दिल्लीतील जनतेने केजरीवालांना का नाकारलं?
Parvesh Verma celebrating victory over Arvind Kejriwal, despite Amit Shah's advice to contest from another party.
Who Defeated Arvind Kejriwal : अमित शाह यांनी दिला होता दुसरीकडून लढण्याचा सल्ला, पण प्रवेश वर्मांनी केजरीवालांना पराभूत करून दाखवलं
Swati Maliwal
Arvind Kejriwal Lost : “अहंकार रावण का भी नहीं बचा था…”, अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर, ‘आप’च्याच खासदाराची पोस्ट व्हायरल
Arvind Kejriwal
Delhi Assembly Election 2025 Results Update : अर्थसंकल्पातील ‘त्या’ घोषणेमुळे दिल्लीत निकाल फिरले? ‘आप’ला नेमका कशाचा बसला फटका?
Delhi election results today
दिल्लीत कोणाची सत्ता?

शिवसेना-राष्ट्रवादीचीही जोरदार कामगिरी

भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीत जोरदार कामगिरी केली आहे. सेनेच्या ५७ पैकी ३० विजयी उमेदवारांना ५०% पेक्षा जास्त मते मिळाली, तर राष्ट्रवादीने ४१ पैकी २० जागा ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवत जिंकल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पिछाडीवर पडलेल्या ५२ विधानसभा मतदारसंघात महायुतीने ५०% हून अधिक मते मिळवली.

महाविकास आघाडीत ५० टक्के मतांसह राष्ट्रवादीने (शरद पवार गट) सर्वाधिक सहा जागा, काँग्रेस पाच जागा आणि शिवसेनेला (ठाकरे गट) चार जागा जिंकता आल्या. महाविकास आघाडीला फक्त तीन जागांवरच ६० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. यात मुंबादेवीमधून काँग्रेसला सर्वाधिक ६३.३ टक्के मते होती. महाविकास आघाडीने ३० टक्के ते ४० टक्के मतांसह सात जागा जिंकल्या आणि ४० ते ५० टक्के मतांच्या दरम्यान २७ जागा जिंकल्या. तब्बल ३४ जागांवर, महाविकास आघाडीचे उमेदवार तिसऱ्या किंवा खालच्या स्थानावर राहीले. यातील २२ जागांवर अनामत रक्कमही जप्त झाली, तर ११ जागांवर त्यांची मते १०% पेक्षा कमी झाली.

हे ही वाचा: मुख्यमंत्रीपदावरून शिंदे यांची माघार? शिवसेनेचा आक्रमकपणा मावळला

१६ उमेदवार १ लाखांहून अधिक मतांनी विजयी

या निवडणुकीत महायुतीने सरासरी ४१०० मतांच्या फरकाने विजय मिळवले आहेत. हे विजय महाविकास आघाडीच्या सरासरी १९,२०० मतांच्या फरकाच्या दुप्पट होते. एकूणच, राज्याचे सरासरी विजयाचे अंतर ३६,२३० मते होते, जे २०१९ मध्ये २८,४४० आणि २०१४ मध्ये २२,८१० इतके होते. राज्यात १६ उमेदवारांनी १ लाखांपेक्षा जास्त मतांच्या अंतराने विजय मिळवले आहेत. या सर्व जागा महायुतीने जिंकल्या आहेत, शिरपूरमध्ये भाजपने सर्वाधिक १.४६ लाख मतांनी विजय मिळवला आहे. केवळ ४४ जागांवर सत्ताधारी महायुतीचे मताधिक्य १०,००० च्या खाली आणि २४ जागांवर ५,००० च्या खाली आहे. भाजपने सर्वात कमी फरकाने बेलापूरमधून विजय मिळवला, तिथे त्यांच्या उमेदवाराचे मताधिक्य फक्त ३७२ इतके होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकही उमेदवार १ लाखांहून अधिक मतांनी जिंकला नाही. मुंब्रा कळव्यातून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जितेंद्र यांनी महाविकास आघाडीत सर्वाधिक ९६२३० मतांनी विजय मिळवला. यासह ५० हजार हून अधिक मताधिक्यांसह आघाडीने ५ जागांवर विजय मिळवला. त्यांनी २२ जागा १० हजारांहून कमी मतांनी तर १० जागा पाच हजारांहून कमी मतांनी जिंकल्या. महाविकास आघाडीतून काँग्रेसचे नाना पटोले यांनी सर्वात कमी २०८ मतांनी विजय मिळवला.

Story img Loader