सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी चार लोकसभा मतदारसंघातील प्रमूख पक्षाचे उमेदवार घोषित झाले आहेत तर चार लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीला उमेदवार ठरविता आलेले नाहीत. त्यामुळे रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या विरोधातील उमेदवार कोण, हे अद्यापि ठरलेले नाही. तसेच चंद्रकांत खैरे आणि ओम राजे निंबाळकर या उद्धव ठाकरे गटातील प्रतीस्पर्धी उमेदवारही निश्चित झालेले नाहीत.

नांदेडमधून भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात कॉग्रेसचे वसंत चव्हाण निवडणूक लढविणार आहेत. मात्र, ही निवडणूक दोन उमेदवारांपेक्षाही अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. राज्यसभेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपचा उमेदवार निवडून आणणे ही राजकीय अपरिहार्यता झाली असल्याने त्यांचे प्रचार दोरे वाढले आहेत. रावसाहेब दानवे व पंकजा मुंडेही गावोगावी जात आहेत. मात्र, प्रताप पाटील व रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी कोठे रोखले नाही. प्रताप पाटील यांच्याऐवजी अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांचा रोष सहन करावा लागत आहेत. पंकजा मुंडे यांनाही काळे झेंडे दाखविण्याचे प्रयत्न झाले.

हेही वाचा >>> पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…

परभणीमध्ये नुकतेच महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ‘ जिल्हा बाहेर’ चा उमेदवार अशी टीका केली जात असली तरी ‘ जानकरांची वाट दिल्लीत पंतप्रधान मोदी पाहत आहेत, त्यांना दिल्लीला पाठवा ’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. लातूरमधील राजकीय लढाही आता स्पष्ट होऊ लागला असून सुधाकर श्रृंगारे यांच्या विरोधात डॉ. शिवाजी काळगे या लढतीत लिंगायत मतपेढी अधिक सशक्त राहू शकते असे लक्षात आल्यानंतर भाजपने अर्चना चाकुरकर यांना पक्षात घेतले. हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर निर्माण झालेला वादही आता चर्चेत आला आहे.

हेही वाचा >>> इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार

महाविकास आघाडीत बीडमधून उमेदवार कोण असेल हे अद्यापही शरद पवार यांच्या राष्ठ्रवादी कॉग्रेसे ठरवले नाही. तसेच रावसाहेब दानवे यांच्या विरोधातील कॉग्रेसचा उमेदवारही ठरू शकला नाही. बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र, उमेदवार लटकलेले असल्याने राजकीय पटावर ‘गाेंधळात गोंधळ’ सुरू आहे. उस्माबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उमेदवार ठरविता आलेला नाही.