छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील अनेक नेते ‘राज्यस्तरीय’ असे गोंडस नाव देत कार्यक्रम, महोत्सवांचे आपल्याच मतदारसंघात आयोजन करून मंत्रीपदाचा पुरेपूर वापर करत असल्याचे वेगवेगळ्या निमित्ताने पुढे येत आहे. राज्यस्तरीय कृषी महोत्सव आपल्याच मतदारसंघात घेण्याचा महायुतीतील नेते अब्दुल सत्तार यांनी पायंडा पाडल्यानंतर त्यांचाच कित्ता विद्यमान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही गिरवला आहे. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलिकडेच त्यांच्या मतदार संघात राष्ट्रीय स्तरावरील पशु प्रदर्शन आयोजित केले होते. यातून खर्च राज्य शासनाचा आणि शक्तिप्रदर्शन नेत्यांचे, असेच चित्र निर्माण झाले आहे.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात २१ ते २५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. २१ ऑगस्ट रोजी या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उदघाटन समारंभाला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आदींची उपस्थिती होती. महोत्सवात काय व्यवस्था, काय सुविधा, शेतकऱ्यांना काय घेता येणार, याची कुठलीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, किसान सन्मान योजनेचा चौथा हप्ता याच महोत्सवाच्या मंचावरून राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याचे नेत्यांनी जाहीर केले. महोत्सवाच्या आयोजनाबद्दल सर्वच प्रमुख नेत्यांनी धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. मुंडे यांनीही या निमित्ताने महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन दाखवून दिले.

Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
election
आमगावात विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; अर्जुनी मोरगावमध्ये माजी आमदाराला संधी
Anil Deshmukh, Anil Deshmukh news, Anil Deshmukh latest news,
देशमुखांची बदलेली भूमिका गृहकलह की राजकीय खेळी ?
NCP Ajit Pawar candidate for existing MLAs in Pune district Pune news
वर्चस्वासाठी विद्यमानच वरचढ; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पुणे जिल्ह्यात सावध पवित्रा
Nationalist Ajit Pawar Group MLA Yashwant Mane
यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण? मोहोळमध्ये आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी
bhandara MLA Narendra Bhondekar said i received Mahavikas Aghadi proposal but did not accept it
मला महाविकास आघाडीकडून… शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट…
Rohit Pawar
Rohit Pawar : खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले, “लक्षात ठेवावं…”

हेही वाचा…‘SC, ST आरक्षणात वर्गीकरण नको’, अन्यथा ‘भारत बंद’ पेक्षाही मोठे आंदोलन करू; केंद्र सरकारला संघटनांचा इशारा

दोन वर्षापूर्वी अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याकडे कृषीमंत्रीपद असताना सिल्लोड या त्यांच्या मतदारसंघात राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. पावत्या फाडण्यावरून तेव्हा सत्तार यांच्या सिल्लोडमधील कृषी महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तेव्हाही सत्तार यांनी महोत्सवाच्या आयोजना शक्तिप्रदर्शन केले होते. कृषीमंत्र्यांनी आपल्याच मतदारसंघात कृषी महोत्सव घ्यायचा पायंडा तेव्हा सत्तार यांनी पाडला आणि तोच कित्ता आता धनंजय मुंडे यांनीही गिरवला आहे. अलिकडेच पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रीय स्तरावरील पशुप्रदर्शन आयोजित केले होते. गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर त्यांच्या जामनेर येथे पाठवण्याचा सपाटा लावला होता. त्याविरुद्ध थेट खंडपीठात दाद मागण्यात आल्यानंतर प्रतिनियुक्तीवर पाठवणे थांबले होते. यातून मी मंत्री, माझ्याच मतदारसंघासाठी सर्व यंत्रणा लावण्याची ‘जबाबदारी’ असे चित्रच निर्माण झाले आहे.