अलिबाग: कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघात, पुन्हा एकदा दोन तुल्यबळ उमेदवारांमधील लढाई पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्यात होणार आहे. दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन लढतींमध्ये १-१ अशी बरोबरी झाली आहे. यामुळे तिसरी लढत उभयतांसाठी तेवढीच महत्त्वाची आहे.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत गीते विरुध्द तटकरे अशा लढतीचा पहिला अंक पार पडला होता. देशभरात मोदी लाट असतांना सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना शेवटच्या फेरी पर्यंत झुंजवले होते. अटीतटीच्या लढतीत गीते जेमतेम दोन हजार मतांनी निवडून आले होते. तेव्हा सुनील तटकरे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला ज‌वळपास नऊ हजार मते मिळाली होती.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन
Thane Passengers loot rickshaw, Thane rickshaw meter, Thane, rickshaw meter,
ठाणे : रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट

हेही वाचा : “सूरतमध्ये जे झालं ते फारच वाईट, पण काँग्रेस डबघाईला आल्यास काय करणार?” विजय रुपाणींचा हल्लाबोल

२०१९ मध्ये पुन्हा एकदा देशात मोदी लाटेचा प्रभाव होता. मात्र यावेळी तटकरे यांनी अनंत गीते यांचा ३० हजार मतांनी पराभव केला होता. म्हणजेच या दोन्ही निवडणूकीत मोदी लाटेचा प्रभाव फारसा दिसून आला नाही. या निवडणूकीत रायगडचे मतदार मतांचे दान कोणाच्या पारड्यात टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मतदारसंघातील बदलेली राजकीय समीकरणे आणि मुस्लिम आणि बहुजन मतांचे ध्रुवीकरण करण्याची होत असलेले प्रयत्न यामुळे ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी पुन्हा एकदा आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून शेकाप आणि काँग्रेसचे खासदार मतदारसंघातून आलटून पालटून निवडून येत असत. पण काळानुरूप मतदारसंघात दोन्ही पक्षांची वाताहत झाली. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात नाहीत. त्यांची जागा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतली आहे.

हेही वाचा : मोदींची ‘विदाई’ बिहारमधून होईल म्हणणारा उमेदवारच देऊ लागला चारशेपारच्या घोषणा

गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्याने दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली आहे. दोन्ही गट परस्पर विरोधी गटात सहभागी झाले आहेत. युती आघाडीच्या राजकारणाची समिकरणे ३६० अंशाच्या कोनात बदलली आहे. त्यामुळे मतदारही काहीसे संभ्रमावस्थेत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपची भक्कम साथ तटकरे यांच्यासाठी जमेची आहे. मात्र त्याच वेळी मुस्लिम आणि बहुजन मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत. दुसऱ्या बाजूला मुस्लिम आणि बहुजन मतांचे होणारे ध्रुवीकरण अनंत गीतेसाठी फलदायी ठरण्याची शक्यता आहे. शेकापची साथही त्यांना यंदा मिळणार आहे. मात्र त्याच वेळी शिवसेनेत पडलेली उभी फूट, त्यामुळे ठाकरे गटाची मतदारसंघात झालेली वाताहत आणि विरोधी पक्षांचा सातत्याने घटणारा प्रभाव गीतेंसाठी अडचणीचा असणार आहे. मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. हा समाज कोणाच्या पाठीशी उभा राहणार यावर दोन्ही उमेदवारांच भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेना ठाकरे गटातही सारे आलबेल नाही. गेल्या आठवड्यात भास्कर जाधव आणि गीतेंमध्चे व्यासपीठावर घडलेल्या प्रकारावरून हे समोर आले होते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या मुस्लिमांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर भाजपातील नेत्याचाच घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?

वंचित बहुजन आघाडीने कुमूदीनी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. पण सध्यातरी त्या मतदारांवर कितपत प्रभाव पाडतील याबाबत साशंकता आहे.

ही लढाई भ्रष्टाचारा विरुध्द सदाचाराची लढाई आहे. ज्यांनी मतदारांचा विश्वासघात केला, पक्षाशी गद्दारी केली, मित्र पक्षांना फसवले, त्यामुळे त्यांना मतदार या निवडणूकीत धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत.

अनंत गीते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

सहा वेळा खासदार आणि दोन केंद्रीय मंत्रीमंडळात असूनही गीते जिल्ह्यात एकही प्रकल्प आणू शकले नाहीत. खासदार निधी संपविण्याकडे त्यांनी काही केलेले नाही. गेल्या पाच वर्षात ते कुठेच दिसले नाहीत. या उलट मी सतत मतदारसंघात होतो. त्यामुळे सक्रीयता विरोधात निष्क्रीयता अशी ही लढाई आहे.

सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)

हेही वाचा : ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, काँग्रेसकडे देशाला देण्यासारखं काही राहिलेलं नाही

मतदारसंघातील पक्षीय बलाबल…..

विधानसभेतील सद्यस्थिती

अलिबाग- शिवसेना शिंदे गट

पेण- भाजप

महाड- शिवसेना शिंदे गट

श्रीवर्धन- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

दापोली- शिवसेना शिंदे गट

गुहागर- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट