मोहन अटाळकर

अमरावती : विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात दोन वेळा प्रतिनिधित्‍व करणारे भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव हा पश्चिम विदर्भात वर्चस्‍व प्रस्‍थापित करू पाहणाऱ्या भाजपासाठी मोठा धक्‍का ठरला आहे. या निवडणुकीत जुन्‍या पेन्‍शनचा मुद्दा प्रभावी ठरल्‍याचे पहायला मिळाले. दुबळ्या मानल्‍या गेलेल्‍या शिक्षक, कर्मचारी संघटनांनी दाखवलेली एकजूट, प्रस्‍थापित विरोधी मतांचा कौल ( अॅन्‍टी इन्‍कबन्‍सी), पक्षांतर्गत नाराजी याचा फटका भाजपाला बसला.

Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
GST Council Meeting (1)
जीएसटी परिषदेची बैठक संपन्न! देशात काय स्वस्त, काय महागणार?
Vijay Wadettiwar On Bmc Election 2025
Vijay Wadettiwar : ‘मविआ’त बिघाडी? महापालिकेच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे स्वबळाचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाची…’

या निवडणुकीत सर्वात आधी डॉ. रणजित पाटील यांच्‍या उमेदवारीची घोषणा झाली. डॉ. पाटील हे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या निकटचे. त्‍यामुळे ही निवडणूक भाजपासाठी आणि फडणवीस यांच्‍यासाठी प्रतिष्‍ठेची बनलेली. उमेदवारी अर्ज भरण्‍याच्‍या दिवशी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या उपस्थितीत भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. सर्वाधिक नोंदणी आणि कार्यकर्त्‍यांचे जाळे या बळावर ही जागा सहजपणे जिंकू, असा दावा करण्‍यात आला. दुसरीकडे, महाविकास आघाडीत उमेदवारीचा घोळ अखेरपर्यंत चालला. उमेदवारीसाठी कॉंग्रेसचे अनेक इच्‍छूक उमेदवार रांगेत असताना धीरज लिंगाडे यांना उमेदवारी मिळाली. कॉंग्रेसने शिवसेनेच्‍या उद्धव ठाकरे गटातून आयात केलेल्‍या उमेदवाराला संधी दिली, म्‍हणून भाजपने टीकाही केली. महाविकास आघाडीच्‍या घटक पक्षात समन्‍वयाचा अभाव असल्‍याचे बोलले जाऊ लागले. पण, मतदारांच्‍या मनात काय चालले आहे, याचा अदमास भाजपा नेत्‍यांच्‍या लक्षात आला नव्‍हता.

हेही वाचा… नागपूरमध्ये पदवीधर पाठोपाठ शिक्षकमधील पराभव भाजपच्या जिव्हारी

‘कार्यक्रम व्‍यवस्‍थापन’ शैलीतून ही निवडणूक जिंकता येऊ शकते, हा भाजपा नेत्‍यांचा भ्रमाचा भोपळा मतदारांनी फोडला. सुमारे २ लाखावर मतदारांची नोंदणी झाली असताना केवळ ४९ टक्‍के मतदान झाले आणि तेथूनच डॉ. रणजित पाटील यांच्‍या समर्थकांना धक्‍के बसण्‍यास सुरूवात झाली. ‘नुटा’, ‘विज्‍युक्‍टा’ या शिक्षकांच्‍या दोन संघटनांनी आपली भूमिका जाहीर केली नव्‍हती. इतर कर्मचारी संघटनाही फारशा व्‍यक्‍त झाल्‍या नाहीत, पण जुन्‍या पेन्‍शनचा मुद्दा धगधगत होता. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी, शिक्षक चांगलेच नाराज झाले होते. त्यामुळे ‘नो पेन्‍शन- नो वोट’ अशी भूमिका मतदारांनी घेतली. त्याचा मोठा फटका भाजपला या निवडणुकीत बसला आणि हाच मुद्दा कॉंग्रेसच्या पथ्यावर पडला.

हेही वाचा… सत्यजित तांबे यांच्या भविष्यातील भूमिकेविषयी उत्सुकता

बारा वर्षांपुर्वी हा मतदार संघ ‘नुटा’च्‍या ताब्‍यातून भाजपाने हिसकावून घेतला होता. पाच वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्‍व करणारे प्रा.बी. टी. देशमुख यांचा पराभव हा धक्‍कादायक मानला गेला होता. तेव्‍हापासून या मतदार संघावरील व्‍यावसायिक संघटनांची पकड सैल झाल्‍याचे बोलले जाऊ लागले, पण ‘नुटा’ने यावेळी आपली संघटित शक्‍ती दाखवून दिली.

हेही वाचा… कोकणात भाजपची रणनीती फळाला

प्रस्‍थापित विरोधी कौल हा मुद्दा अंगलट येऊ शकतो, याचा अंदाज भाजपाच्‍या नेत्‍यांना आला नाही. गेली बारा वर्षे प्रतिनिधित्‍व करणाऱ्या डॉ. रणजित पाटील यांच्‍या जनसंपर्कातील कमतरता, सत्‍तेतील महत्‍वाचे पद नसणे, कार्यकर्त्‍यांमधील वाढलेली दरी, स्‍वगृही अकोला जिल्‍ह्यातच पक्षांतर्गत विरोधकांनी त्‍यांच्‍या अडचणी वाढवल्‍या. दुसरीकडे, धीरज लिंगाडे हे नवखे असूनही त्‍यांना महाविकास आघाडीतील मतांची मोट बांधण्‍यात यश आले आणि विजय साकारता आला.

Story img Loader