नवी दिल्ली : ‘तुम्ही एकदिलाने हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लढल्या नाहीत. तुम्ही एकमेकांविरोधात जाहीर आरोप-प्रत्यारोप करत राहिलात. आपापसांतील भांडणांमुळे काँग्रेसचा पराभव झाला. वातावरण आपल्या बाजूने होते तरीही त्याचा लाभ तुम्हाला घेता आला नाही’, अशी खरडपट्टी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये काढली. पण, दोन्ही राज्यांतील पराभवाबद्दल प्रदेश नेत्यांविरोधात कोणती कारवाई केली जाईल, याबाबत खरगेंनी बैठकीमध्ये मौन बाळगले.

हरियाणातील पराभवामागे भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा, रणदीप सुरजेवाला यांच्यामधील संघर्ष कारणीभूत असल्याचे मानले गेले. महाराष्ट्रामध्येही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदी काही नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याची चर्चा होत होती. खरगेंनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नसले तरी, ‘निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय नेत्यांवर किती कळ अवलंबून राहणार’, असा थेट प्रश्न करत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना जाब विचारला.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
Conflict in Mahayuti over post of Guardian Minister of Raigad aditi tatkare bharat gogawale
रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत संघर्ष
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
Vijay Wadettiwar On Bmc Election 2025
Vijay Wadettiwar : ‘मविआ’त बिघाडी? महापालिकेच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे स्वबळाचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाची…’
Fake WhatsApp of Mira Bhayandar Municipal Commissioner crime news
मिरा भाईंदर पालिका आयुक्तांचे बनावट व्हॉट्सअप; अधिकाऱ्यांकडेच पैशांची मागणी

हेही वाचा >>>काँग्रेसचा ईव्हीएमवरील राग अनाठायी; पराभव होणार हे अंतर्गत सर्वेक्षणातून झालं होतं स्पष्ट

‘तुमच्यामध्ये एकी नाही, नेत्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे संघटना कमकुवत झाली आहे, प्रदेश स्तरावर संघटनेने अपेक्षित काम केलेले नाही, असे असेल तर निवडणुका कशा जिंकणार? संघटना मजबूत असेल तर पक्ष जिंकेल आणि पक्ष जिंकला तरच तुम्हीही टिकाल’, असे खडेबोल खरगेंनी सुनावले. ‘आपणच आपले शत्रू बनलो आहोत. आपण नकारात्मक गोष्टी बोलू लागलो आहोत, आपल्यामध्ये नैराश्य आले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याकडे ‘नेरेटिव्ह’ असे आपण बोलू लागलो आहोत पण, भाजपविरोधात नेरेटिव्ह तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे’, असा सवाल खरगेंनी केला.

प्रदेश नेत्यांना चपराक

‘राष्ट्रीय मुद्दे आणि राष्ट्रीय नेत्यांच्या आधारावर किती दिवस तुम्ही निवडणूक लढवणार? बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता असे ज्वलंत प्रश्न होते. जातनिहाय जनगणनेचाही मुद्दा होता. पण, केवळ राष्ट्रीय मुद्द्यावर निवडणूक लढवता येत नाहीत. राज्यांचे स्थानिक मुद्दे काय आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज होती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे मुद्दे-समस्या असतात, ते समजून घेऊन त्यासंदर्भात प्रचाराची रणनीती आखण्याची गरज होती. पण, यापैकी प्रदेश नेत्यांनी काहीही केले नाही, अशी चपराक खरगेंनी लगावली. या बैठकीमध्ये राहुल गांधीही उपस्थित होते.

हेही वाचा >>>काँग्रेसचा ईव्हीएमवरील राग अनाठायी; पराभव होणार हे अंतर्गत सर्वेक्षणातून झालं होतं स्पष्ट

भाजपप्रमाणे तंत्र शिका’

निवडणुका जिंकायच्या असतील तर काँग्रेसला बुथस्तरावर काम करावे लागेल. निवडणुकीआधी किमान एक वर्ष नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. बुथस्तरावर संघटना मजबूत करावी लागेल. मतदार यादी तयार करण्यापासून मतमोजणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सतर्क राहावे लागेल. निवडणूक लढण्याची पद्धत काँग्रेसला बदलावी लागेल. भाजपप्रमाणे सुक्ष्म संवादाचे तंत्र शिकले पाहिजे. भाजपच्या गैरप्रचाराविरोधात लढण्याचे नवे मार्ग शोधावे लागतील, अशी आक्रमक भूमिका खरगेंनी घेतली.

महाराष्ट्र आणि हरियाणामधील निवडणुकीत वातावरण काँग्रेससाठी अनुकूल होते. पण केवळ वातावरण अनुकूल असल्यामुळे विजय मिळत नाही, त्याचे मतांमध्ये रुपांतर करावे लागते, हा फायदा काँग्रेसला करून घेता आला नाही.-मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस</strong>

Story img Loader