पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या निर्विवाद यशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीकरिता भाजपला धोक्याचा इशारा मानला जातो. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालेल्या राज्याच्या उत्तर भागातही तृणमूल काँग्रेसने यश संपादन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनपेक्षितपणे मुसंडी मारली होती. लोकसभेच्या ४२ पैकी १८ जागा जिंकून भाजपने तृणमूलला मोठा धक्का दिला होता. तृणमूलचे २२ खासदार निवडून आले होते. भाजपला मिळालेल्या यशाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा गोंधळल्या होत्या. पण दोन वर्षांत त्यांनी भाजपला राजकीयदृष्ट्या रोखण्यावर भर दिला. लोकसभेच्या यशाने भाजपला सत्तेची स्वप्ने पडू लागली. सत्ता नाही मिळाली तरी १०० पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट भाजपचे होते. पण विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी २०० पेक्षा अधिक जागा जिंकून ममता बॅनर्जी यांनी भाजपला धक्का दिला.

हेही वाचा – विरोधी पक्षनेतेविनाच पावसाळी अधिवेशन?

आगामाी लोकसभा निवडणुकीत २०१९ची पुनरावृत्ती करण्याची भाजपची योजना आहे. या दृष्टीने पंचायत निवडणुकांकडे बघितले जात होते. पण ६३ हजार ग्रामपंयाचतींच्या जागांपैकी ३५ हजारांपेक्षा अधिक जागा जिंकून तृणमूलनी आपली पकड कायम राखली आहे. भाजपला १० हजारांच्या आसपास जागा मिळाल्या आहेत. ग्रामीण भागातील आपली पकड अधिक घट्ट करण्यात ममता बॅनर्जी यांना यश मिळाले. यामुळेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरिता भाजपसमोर पश्चिम बंगालमध्ये मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee big victory is a warning for bjp print politics news ssb