गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या ‘कॅश फॉ क्वेरी’च्या आरोपामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. अदाणी उद्योग समूहाला अडचणीत आणण्यासाठी तसेच संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोईत्रा यांनी पैसे घेतल्याचा आरोप भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला. विशेष म्हणजे या आरोपांनंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे नेते तसेच मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर मात्र ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर थेट हल्लाबोल केला. याच कारणामुळे महुआ मोईत्रा यांना पक्षाकडून साथ मिळत नाहीये का? ममता बॅनर्जींच्या मौनाचा अर्थ काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिप्रिया यांच्यावरील आरोपानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

गुरुवारी (२६ ऑक्टोबर) ज्योतिप्रिया मल्लिक यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली. ज्योतिप्रिया यांना काही झाले तर आम्ही ईडीवर गुन्हा दाखल करू, असा इशारा बॅनर्जी यांनी दिला. तसेच “ज्योतिप्रिया यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांचा मृत्यू झाल्यास आम्ही थेट ईडी आणि सीबीआयविरोधात गुन्हा दाखल करू. ईडी, सीबीआयकडून अन्य लोकांचे नाव घ्यावे म्हणून अटक केलेल्या व्यक्तीस त्रास दिला जातो. हा लोकांवर अत्याचार आहे,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

चौकशी समितीच्या निकालाची आम्ही वाट पाहतोय”

दुसरीकडे मात्र महुआ मोईत्रा यांच्याबाबत मात्र तृणमूल काँग्रेस तसेच ममता बॅनर्जी यांनी अद्याप मौन बाळगले आहे. तसेच मोईत्रा यांची थेट पाठराखणही केलेली नाही. तृणमूलचे नेते तथा राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना “या प्रकरणात महुआ मोईत्रा यांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभेच्या समितीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीच्या निकालाची आम्ही वाट पाहात आहोत,” असे ओब्रायन म्हणाले.

…म्हणजेच महुआ मोईत्रा दोषी आहेत, भाजपाचा दावा

तृणमूल काँग्रेसच्या याच मौनाचा आधार घेत भाजपाने मोईत्रा दोषी असल्याचा दावा केला. ममता बॅनर्जी यांचे मौन हेच मोईत्रा या दोषी असल्याची पावती आहे, असे भाजपाचे नेते म्हणत आहेत. महुआ मोईत्रा या भाजपाच्या कठो टीकाकार आहेत. त्यांची भाजपावर टीका करतानाची अनेक भाषणे चांगलीच चर्चेत आली होती. असे असताना ममता बॅनर्जी यांच्या मौनामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee silent over mahua moitra cash for query allegations prd
Show comments