आज शुक्रवारी (९ ऑगस्ट) आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया तिहार तुरुंगातून बाहेर आले. जवळपास दीड वर्ष ते तुरुंगात होते. काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष सातत्याने अडचणीत येताना दिसत आहे. सध्या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हेखील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. अशा पार्श्वभूमीवर मनीष सिसोदिया यांना मिळालेला जामीन आम आदमी पक्षासाठी निश्चितच दिलासादायक आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारला मोठा झटका दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, नायब राज्यपालांना सरकारच्या सल्ल्याशिवाय दिल्ली महानगरपालिकेत अल्डरमनची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदा ठरवण्यास नकार दिला. तसेच, त्यांचा अंतरिम जामीनही नाकारला. त्यामुळे उच्च न्यायालयाकडूनही आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. आता आम आदमी पक्षाला ट्रायल कोर्टात परत जावे लागणार आहे. या न्यायालयामध्ये सीबीआयच्या एक्साईज पॉलिसी प्रकरणामधील जामिनाच्या याचिकेवर युक्तिवाद केला जाईल. ईडीच्या पीएमएलए प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आधीच अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा