अनिकेत साठे

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यात अलीकडेच झालेल्या काही कार्यक्रमांतील कमी गर्दीवरून विरोधक उपरोधिक सुरात टिपण्णी करीत असताना मनमाडमध्ये मात्र पूर्णत: वेगळे चित्र दिसल्याने मुख्यमंत्रीही सुखावले. करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजना आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन मनमाड शहरातील महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर हजारोंच्या उपस्थितीत झाले. मनमाडसाठी पाणी पुरवठा योजना किती महत्त्वाची आहे, हे इतक्या मोठ्या उपस्थितीवरून लक्षात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनाही मान्य करावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनातून रखडलेले प्रश्न मार्गी लावता येतात. विरोधकांना शह देता येतो. शिवाय, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळविण्यासाठीच्या मोर्चेबांधणीलाही महत्त्व प्राप्त होत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखीत झाले.

industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…
There will be investigation into bogus crop insurance case says Devendra Fadnavis
तर पीक विम्याच्या बोगस प्रकरणाची सखोल चौकशी- देवेंद्र फडणवीस
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
The importance of Girish Mahajan Vikhe Patil Dhananjay Munde is reduced
गिरीश महाजन, विखे-पाटील, धनंजय मुंडे यांचे महत्त्व कमी
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत

शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम झाला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या पहिल्या पाच आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. शिंदे गटात प्रवेश करणारे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. यातील दुसरे म्हणजे दादा भुसे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते कृषिमंत्री होते. गोहाटीत इतरांच्या तुलनेत ते उशिराने पोहोचले. तरीदेखील ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना बंदरे व खनिकर्म या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची माळही गळ्यात पडली. सुरूवातीपासून शिंदे गटाचे समर्थन करणारे मात्र अद्याप प्रतिक्षेत आहेत. लवकरच होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपले दावे बळकट करण्याच्या दृष्टीने अनेकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. या स्पर्धेत कांदेही उतरल्याचे मनमाडमधील शक्ती प्रदर्शनातून उघड झाले.

हेही वाचा… विदर्भात एकेकाळचे कट्टर विरोधक एकाच मंचावर ; सत्तांतरानंतर वैर संपले?

स्थानिक राजकारणात पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार कांदे यांच्यात फारसे सख्य नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्र्यांच्या मान्यतेने विकास कामांसाठी निधी दिला जातो. त्यामुळे कदाचित सध्या कांदेंना टोकाची भूमिका घेणे जड जाते. महाविकास आघाडीच्या काळात निधी वाटपातील दुजाभावावरून त्यांनी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी थेट संघर्ष केला होता. त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत सबुरीचा सल्ला देणाऱ्या तत्कालीन शिवसेना नेत्यांनाही जुमानले नव्हते. भुजबळांशी संघर्षाचे मूळ नांदगावच्या राजकारणात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार पंकज भुजबळांना कांदेंनी पराभूत केले होते. नांदगावमध्ये शिवसेनेत दोन गट असले तरी त्यांचा ठाकरे गटापेक्षा भुजबळ आणि पर्यायाने राष्ट्रवादीच पहिला शत्रू आहे. त्यामुळे मनमाड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी ३११ कोटींच्या योजनेचे भूमिपूजन सोहळ्याचे त्यांनी भव्य दिव्य स्वरुपात आयोजन केले. मुख्यमंत्र्यांनी पाणी पुरवठा योजनेसाठी पालिकेने भरावयाची ४७ कोटी लोकवर्गणी राज्य शासन भरणार असल्याचे जाहीर केले. नियोजित एमआयडीसीसाठीचे सर्वेक्षण आणि मनमाड नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी १० कोटी मंजूर करण्यात आले. नांदगावमधील शिवसृष्टी प्रकल्प आणि अन्य विकास कामांना निधीची कमतरता भासणार नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटातील आमदारांना बळ दिले. राज्यातील मंत्रिमंडळात सध्या जिल्ह्यात एकमेव मंत्रिपद आहे. विस्तारात भाजप नाशिकला झुकते माप देईल. शिंदे गटाकडून तसा विचार होण्याची अपेेक्षा बाळगली जाते. मनमाडमधील शक्ती प्रदर्शन या स्पर्धेतील एक टप्पा ठरला आहे.

हेही वाचा… प्रफुल्ल पटेल-फडणवीसांनी परस्परांवर स्तुतीसुमने उधळल्याने तर्कवितर्क

श्रेयवादाची लढाई

भूमिपूजन सोहळ्यापूर्वी आ. आदित्य ठाकरे यांनी नांदगावच्या दौऱ्यावेळी पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली होती. मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचा दावा केला होता. त्याचे श्रेय दुसऱ्याला देऊ नका, असे आदित्य यांनी म्हटले होते. भव्य स्वरुपात कार्यक्रमाचे आयोजन करीत आ. सुहास कांदे यांनी पाणी पुरवठा योजना मार्गी लागण्याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. या सोहळ्यात सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांना व्यासपीठावर स्थान दिले गेले. अपवाद केवळ ठाकरे गटातील नेत्यांचा होता. या कार्यक्रमात पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार कांदे यांनी मनमाडकरांना पाणी पाजले, आता त्यांना विरोध करणाऱ्यांना जनतेने पाणी पाजण्याचा सल्ला दिला. या योजनेवरून शिवसेनेच्या दोन्ही गटात श्रेयवाद सुरू झाला आहे.

Story img Loader