Manoj Jarange Patil : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे राज्यात आता महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. सध्या सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. निवडणुकीचा निकाल लागून आज पाच दिवस झाले पण अद्यापही राज्यात सत्तास्थापन झालेली नाही. सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात नवनिर्वाचित सरकार स्थापन होईल. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीच्या आधी काही महिने राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देखील मनोज जरंगे-पाटील हे चांगलेच चर्चेत होते.

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी मनोज जरंगे-पाटील यांनी वारंवार उपोषण केलं. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना विशेषत: भाजपा आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले. त्यानंतर जरंगे-पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. तसेच नंतर काही उमेदवारांना पाठिंबा दिला होता. एवढंच नाही तर काही उमेदवारांना निवडणुकीत पाडण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर मात्र, सर्वकाही निर्णय मतदारांवर सोडला होता. निवडणुकीच्या निकालानंतर आता निर्णय आला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठपैकी केवळ एक जागा जिंकणाऱ्या महायुतीने विधानसभा निवडणुकीतही मराठवाड्यात मोठी बाजी मारली.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Vinod Kambli Admitted To Hospital After Suddenly Health Deteriorated in Thane
Vinod Kambli: विनोद कांबळीची तब्येत बिघडली, तात्काळ रूग्णालयात केलं दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
ek thali ek thaili rss
महाकुंभ २०२५! ‘एक थाळी एक थैली’ आणि ‘ समयदानी ‘ उपक्रम
Loksatta balmaifal Diwali Holiday Science Exhibition Christmas
बालमैफल: जिंगल बेल… जिंगल बेल…

हेही वाचा : मुस्लीमबहुल मतदारसंघांत महायुतीचा फायदा, ‘व्होट जिहाद’च्या आरोपानंतरही अधिक जागा; ३८ मतदारसंघांपैकी २१ ठिकाणी यश

मराठा समाजाच्या या बालेकिल्ल्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून ४६ पैकी ४० जागा जिंकल्या. तर त्यापैकी एकट्या भाजपाने १९ जागा जिंकल्या. मराठ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा असलेल्या महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या. लोकसभेच्या निकालांवर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास पाच महिन्यांपूर्वी मराठवाड्यात महायुती ३२ जागांवर पिछाडीवर असल्याचे स्पष्ट होते. यावेळी युतीने या सर्व ३२ जागा जिंकल्या, पण आठ अतिरिक्त मतदारसंघही मिळवले.

मराठा आरक्षण आंदोलनानंतर चर्चेचा मुद्दा बनलेला ओबीसी-मराठा वैमनस्यही भाजपाप्रणित महायुतीच्या लाटेत संपुष्टात आले. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये ११ मराठा आहेत. मात्र ४ ओबीसी, २ एसटी, एक एससी आणि एक मारवाडी आहे. महायुतीच्या मोठ्या यशानंतर आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र, सरकार स्थापन होण्याच्या आधीच जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा संपलेला नाही, असं सांगत उपोषणाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, विधानसभेच्या निकालानंतर ते पत्रकारांशी बोलताना जरांगे-पाटील यांनी म्हटलं की, “मी निर्णय मतदारांवर सोपवला होता. पण लक्षात ठेवा या निवडणुकीत मराठ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जर तुम्हाला वाटत असेल की त्यांनी ती भूमिका बजावली नाही तर तुम्हाला मराठा समाजाकडे पाहावे लागेल. जरांगे पाटलांनी ज्या उमेदवारांना विरोध केला त्या जागाही भाजपाने जिंकल्या. त्याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्यांना निवडून द्या आणि विरोध करणाऱ्यांना पराभूत करा असं आवाहन मराठा समाजाला केलं होतं. त्यानुसार त्यांनी ते ठरवलं.”

भाजपा मराठवाड्यात १९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर मित्रपक्ष शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ८ वर आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने ५ जागांपैकी ३ शिवसेना (ठाकरे), एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी (SP) ने जिंकली तर एक जागा अपक्षांना गेली. मराठा समाजाचा पाठिंबा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपाला यश मिळालं. खरं तर जरांगे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, तरीही फडणवीसांनी संयम राखला आणि कार्यकर्त्यांवर नाव घेऊन हल्ला केला नाही. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची अनेकदा भेट घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही भेटले नाहीत. ते जालना आणि जरांगे पाटील यांच्या घरापासून दूर राहिले.

हेही वाचा : ‘निवडणुकीआधी केवळ जागावाटपावर चर्चा’; मुख्यमंत्री पदाबाबतचा शिवसेनेचा दावा अजित पवारांनी फेटाळला

निवडणुकीत फडणवीसांनी मराठवाड्यातील ४६ जागांपैकी दोन सभांना संबोधित केलं. यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये. दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या फडणवीस विरोधी मोहिमेच्या अपयशाचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे येवला मतदारसंघाचा निकाल आहे. या येवला मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे उमेदवार ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवली होती. प्रचारादरम्यान जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करणारे छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांचे कठपुतली असल्याचा आरोप केला होता. एवढंच नाही तर जरांगे पाटील यांनी येवल्यात रोड शो आणि रॅलीही काढली होती, तसेच भुजबळांना पराभूत करण्याचे आवाहन केले होते.

भुजबळांच्या विरोधात शरद पवार यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला. मात्र, भुजबळ २६ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. २०१९ मधील ५६,००० मतांच्या फरकापेक्षा हे खूपच कमी असले तरी विशेष बाब म्हणजे त्यांनी ज्यांचा पराभव केला ते राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार माणिकराव शिंदे हे मराठा आहेत. येवल्यात मराठा समाजाचे सुमारे १.३५ लाख लोक आहेत. निकाल लागताच भुजबळांनी जरांगे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. “त्यांनी ( जरांगे पाटील) देवेंद्र फडणवीस आणि मला लक्ष्य केलं. पण जरांगे यांनी लक्षात ठेवावं की मराठा मतदार हुशार आहेत, त्यांची सहजासहजी दिशाभूल होत नाही.”

दुसरीकडे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रचारादरम्यान जरांगे पाटील यांची अनेकदा भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा मागितला. मात्र, याचाही इम्तियाज जलील यांना फायदा झाला नाही. कारण भाजपाच्या अतुल सावे यांच्याकडून जवळपास दोन हजार मतांनी इम्तियाज जलील यांना पराभव पत्करावा लागला. योगायोगाने यावेळी भाजपाने जालना लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या तीनही विधानसभा जागा जिंकल्या आहेत.

Story img Loader