दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात मराठी भाषकांची एकजूट झाल्याने चांगले यश मिळण्याच्या अपेक्षेवर पाणी फिरताना दिसत आहे. केवळ बेळगाव दक्षिण या मतदारसंघात रमाकांत कोंडुसकर हे भाजपचे अभय पाटील यांच्याशी कडवी झुंज देताना दिसत आहेत. अन्य मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.

एकीकरण समितीच्या आशा बेळगाव दक्षिण मतदार संघात लागल्या होत्या. येथे भाजपचे अभय पाटील यांना सहाव्या फेरीत ५२ हजार मते मिळाले आहेत. तर कोंडुस्कर यांनी ४६ हजार मते घेतली आहेत. काँग्रेसच्या प्रभावती मस्तमरडी यांना केवळ दहा हजार मते मिळाली आहेत. बेळगाव ग्रामीण मतदार संघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पन्नास हजार मते घेतली आहेत. तर एकीकरण समितीचे आर. एम. चौगुले यांना ३२ हजार मते मिळाली आहेत. भाजप अंतर्गत वादामुळे नागेश मनोळकर हे केवळ १५ हजार मते मिळाली.

हेही वाचा… Karnataka Election Results 2023 Live : “‘या’ एका घोषणेने कर्नाटकात भाजपाचा पराभव”, सचिन पायलट यांनी सांगितलं काँग्रेसच्या विजयाचं कारण

हेही वाचा… Karnataka Election Results 2023: …तरी विजय भाजपाचाच? केंद्रीय नेत्यानं मांडलं गणित; दिली तीन निवडणुकांची आकडेवारी!

निपाणी मतदार संघात भाजपच्या शशिकला जोल्ले या मंत्री असलेल्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. येथे राष्ट्रवादीचे उत्तम पाटील हे त्यांच्याशी कडवी लढत होत आहे. यमकनमर्डी मतदारसंघात काँग्रेसचे बलिष्ठ नेते सतीश जारकीहोळी हे विजयाच्या दिशेने कुच करताना दिसत आहेत.एकीकरण समितीला येथे फारसे यश मिळालेले नाही. बेळगाव उत्तर मतदार संघात भाजपचे डॉक्टर रवी पाटील यांनी आघाडी घेतली आहे. भाजपच्या लिंगायत फॅक्टरला येथे प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. काँग्रेसचे आसिफ सेठ दुसऱ्या स्थानी आहेत. एकीकरणला येथेही अशा असल्याचे सध्यातरी दिसत नाही.

बेळगाव जिल्ह्याचा विचार करता हा जिल्हा भाजपच्या वर्चस्वाकडून आता काँग्रेसच्या प्रभावाकडे जाताना दिसत आहे. १८ मतदारसंघापैकी ११ मतदारसंघात काँग्रेसची सरशी होताना दिसत आहे. अन्यत्र भाजपला प्रतिसाद मिळत आहे. अंतिम मतमोजणीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi dominant area of maharashtra karnataka border area maharashtra ekikaran samiti on trailing print politics news asj
Show comments